Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024: ज्या तरुणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे आणि जे अशा नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून काही पदांसाठीच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. सदर नोकरीबाबत महाराष्ट्र स्टेट बँकेतर्फे घोषणा करण्यात आली आहे व यासंदर्भात सरकारी पोर्टलवर सुद्धा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी ही नोकरी नेमकी कोणत्या पदासाठी तसेच यासाठी शैक्षणिक व अनुभवाच्या पात्रतेचे निकष काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भर्ती 2024 मध्ये २५ रिक्त पदांची भरती सुरू आहे. अधिकृत अधिसूचना २० फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ११ मार्च २०२४ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. mscbank.com या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा

वयाची अट

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर २८ ते ३५ वय असायला हवे.

पदाचे नाव आणि तपशील

या भरती प्रक्रियेतून आयटी, कनिष्ठ अधिकारी पदे, देशांतर्गत व्यापारी अधिकारी पदे, फॉरेक्स डीलर ऑफिसर फॉरेक्स, कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

अधिसूचना – https://www.mscbank.com/careers.aspx

उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवरून थेट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

  • पायरी १: MSC बँकेच्या अधिकृत बँकेला भेट द्या म्हणजे http://www.mscbank.com
  • पायरी २: मेनूमध्ये “करिअर” पर्याय निवडा
  • पायरी ३: महाराष्ट्र स्टेट कोऑपरेशन बँक भर्ती 2024 वर जा.
  • चरण ४: “एमएससी बँक भर्ती 2024 साठी अर्ज करण्यासाठी लिंक” वर क्लिक करा.
  • पायरी ५: “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा किंवा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाका. (आधी जनरेट केले असल्यास).
  • पायरी ६: संबंधित फील्डमध्ये तुमचे आवश्यक तपशील भरा आणि आवश्यकतेनुसार फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
  • पायरी ७: अर्ज सादर करण्यापूर्वी तुमचा प्रविष्ट केलेला तपशील तपासून घ्या.
  • पायरी ८: आवश्यक अर्ज फी भरा, त्यानंतरच तुमचा अर्ज वैध मानला जाईल.

हेही वाचा >> दहावी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; ‘या’ विभागात १०६ रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या तपशील

  • पायरी 9: अधिक माहितीसाठी अधिसुचना डाउनलोड करा.