Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशननी दोन रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे वेळ न घालवता अर्ज करून या संधीचे सोने करू शकता.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अपर महाप्रबंधक आणि संयुक्त महाप्रबंधक (सिविल) या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024)
अधिकृत वेबसाईट – अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या https://mrvc.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
अधिसुचना – अर्ज करण्यापूर्वी
https://mrvc.indianrailways.gov.in/uploads/VN_06_2024AGM_JGM(1).pdf या लिंकवर क्लिक करून अधिसुचना नीट वाचा. अधिसुचनेमध्ये अर्ज प्रक्रियेविषयी योग्य तपशील दिलेला आहे. अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचनेतील माहिती सविस्तर जाणून घ्यावी.
पदाचे नाव – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशननी खालील पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे
१. अपर महाप्रबंधक
२. संयुक्त महाप्रबंधक (सिविल)
पदसंख्या – अपर महाप्रबंधक /संयुक्त महाप्रबंधक (सिविल) या पदासाठी 0२ जागा रिक्त आहेत.
१. अपर महाप्रबंधक – ०१
२. संयुक्त महाप्रबंधक (सिविल) – ०१
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . अधिसुचना नीट वाचावी.
वयोमर्यादा – अपर महाप्रबंधक /संयुक्त महाप्रबंधक (सिविल) या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी वयोमर्यादा ५० वर्षे आहे.
अर्ज पद्धती – तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज career@mrvc.gov.in या ई मेल पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – तुम्ही ७ जून २०२४ पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकता.
हेही वाचा : भारतीय वनसेवा परीक्षेत मराठी टक्का वाढला; महाराष्ट्राच्या प्रतीक्षा काळे देशात दुसऱ्या स्थानी
अर्ज कसा करावा?
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- वरील ई मेल पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
- अर्जात विचारलेली माहिती नीट भरावी आणि कागदपत्रे नीट जोडावे.
- अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येऊ शकते.
- ७ जून पर्यंत अर्ज करावा. त्यानंतर केलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल