Mahanirmiti Koradi Bharti 2024: महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण १९६ पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहे. जर तु्म्हाला महानिर्मिती कोराडी येथे अर्ज करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. नागपूरकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. वरील पदांसाठी अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आणि या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पदाचे नाव – महानिर्मिती कोराडी अंतर्गत खालील विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
- वायरमन
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
- वेल्डर
- ITESM
- कोपा
- टर्नर
- मशिनिस्ट
- फिटर
- इलेक्ट्रीशियन
- पॉवर इलेक्ट्रीशियन
- मशिनिस्ट (ग्राइंडर)
पदसंख्या – महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या 196 जागा रिक्त जागा भरण्यासाठी ही अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे.
- वायरमन – २०
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ११
- वेल्डर – २०
- ITESM – २०
- कोपा – २५
- टर्नर – १०
- मशिनिस्ट – ०५
- फिटर – ४०
- इलेक्ट्रीशियन – २५
- पॉवर इलेक्ट्रीशियन – १५
- मशिनिस्ट (ग्राइंडर) – ०५
हेही वाचा : BOI Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजचं करा अर्ज
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.
अर्ज पद्धती – अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ एप्रिल २०२४ पर्यंत तुम्ही वरील पदांसाठी अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://mahagenco.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.
अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी https://mahabharti.in/mahanirmiti-koradi-bharti-2024/ या लिंकवर क्लिक करावे आणि अधिकृत अधिसूचना नीट वाचावी.
हेही वाचा : ICT Bharti 2024: मुंबई ICT अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; विविध पदांकरीता भरती सुरु, लवकर करा अर्ज
अर्ज कसा करावा?
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
- अर्ज भरण्यापूर्वी वरील अधिकृत अधिसुचना नीट वाचावी.
- अर्ज ०५ एप्रिल २०२४ या शेवटच्या तारखेपूर्वी भरावा.
- विचारलेली माहिती पूर्ण भरावी. अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.