Palghar ZP Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल १८९१ रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून कंत्राटी शिक्षक पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे पालघरमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

एकूण रिक्त पदे – १८९१

पदाचे नाव आणि तपशील

प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)

शैक्षणिक पात्रता

१२वी उत्तीर्ण, D.Ed./D.EI. T.ED/TCH, TET/CTET पैकी एक उत्तीर्ण, पदवीधर/D.EI/B.Sc, सीटीईटी पेपर-२ उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. १७, कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प).

नोकरीचे ठिकाण : पालघर

वयाची अट : १८ वर्षांवरील उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क – कोणतेही शुल्क नाही.

Read More Career News : १२ वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी! नवी मुंबई महानगरपालिकेत ‘इतक्या’ जागांसाठी भरती; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२४

पगार – २० हजार रुपये प्रतिमहिना (कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारास अर्ज भरताना काही अडचणी आल्यास ते पालघर जिल्हा परिषदेची वेबसाइट WWW.zppalghar.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना बघू शकतात. हा अर्ज भरून मग तो जिल्हा परिषदेत पाठावा.

अधिकृत वेबसाइट
zppalghar.gov.in/Home

अधिकृत जाहिरात
zppalghar recruitmet

अर्ज
www.zppalghar.gov.in