PNB Recruitment 2023: पंजाब नॅशनल बॅंक ही भारतातील प्रमुख बॅंकांपैकी एक आहे. या बॅंकेमध्ये लवकरच मेगाभरती होणार आहे. या भरतीद्वारे स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी २०० पेक्षा जास्त योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पीएनबीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथन ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. हे अर्ज बॅंकेच्या pnbindia.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. भरतीच्या ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा ११ जून म्हणजेच आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी घाई करावी लागणार आहे.
पीएनबी भरतीद्वारे स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी २४० उमेदवार निवडले जाणार आहेत. या जागांमध्येही विविधता आहेत. त्यामुळे प्रत्येक रिक्त पदासाठी वेगवेगळे निकष लागू असणार आहेत. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि वय या गोष्टींचा समावेश आहे. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्जासह ठराविक रक्कम प्रवेश शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD अशा आरक्षित वर्गातील उमेदवारांकडून अर्ज करताना ५९ रुपये घेतले जातील.
आणखी वाचा – DRDO मध्ये १५० जागांसाठी होणार भरती! कोण करु शकते अर्ज? जाणून घ्या
निवड प्रक्रिया आणि वेतन
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पदानुसार, ऑनलाइन लिखित परीक्षा आणि मुलाखत यांना उमेदवारांना सामोरे जावे लागेल. ऑनलाइन परीक्षेतील पेपरमध्ये एकूण १०० गुण, तर मुलाखतीमध्ये एकूण ५० गुण असतील. या निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांना मिळलेल्या गुणांवरुन त्यांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला ३६,००० ते ७८,००० रुपये वेतन दिले जाईल. अधिक माहितीसाठी पंजाब नॅशनल बॅंकेच्या pnbindia.in या अधिकृत वेबसाइटची मदत घ्यावी.