DIAT Pune recruitment 2024 : प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे येथे सध्या पदभरती सुरू आहे. एकूण सात जागांवर भरती सुरू करण्यात येत आहे. रिक्त पदांची माहिती आणि पात्रता निकष खाली दिलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. हे अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख २१ फेब्रुवारी आहे. त्याबद्दल अधिक माहिती पाहा.

DIAT Pune recruitment 2024 : रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता

१. ज्युनियर रिसर्च फेलो

या पदासाठी एकूण तीन जागा रिकाम्या आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे प्रथम श्रेणीतील नेट/गेटसह बी.ई / बी. टेक [B.E./B.Tech] ची पदवी असणे आवश्यक आहे. अथवा एम.ई / एम.टेकमध्ये प्रथम श्रेणीतील पदवी आणि पदव्युत्तर पातळीचे शिक्षण असणे गरजेचे आहे.

हेही वाचा : PMPML Recruitment 2024 : पुणे परिवहन मंडळात ‘MBA’ उमेदवारांनाही नोकरीची संधी; पाहा माहिती….

२. सीनियर रिसर्च फेलो

या पदासाठी एकूण तीन जागा रिकाम्या आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे प्रथम श्रेणीतील नेट/गेटसह बी.ई / बी. टेक [B.E./B.Tech] ची पदवी असणे आवश्यक आहे. अथवा एम.ई / एम.टेकमध्ये प्रथम श्रेणीतील पदवी आणि पदव्युत्तर पातळीचे शिक्षण असणे गरजेचे आहे.

३. प्रोजेक्ट असिस्टंट

या पदासाठी एक जागा उपलब्ध आहे. प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे बी.एस्सी. / एम.एस्सी. / इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा किंवा इंग्रजी विषयातील बी.ए./ एम.ए. पदवी असणे आवश्यक आहे.

DIAT Pune recruitment 2024 – अधिकृत वेबसाइट –
https://diat.ac.in/

DIAT Pune recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1AnGJhz7LnVmdOR6HHou6xXCo9hg5DBy_/view

हेही वाचा : MSAMB recruitment 2024 : पुण्यात नोकरीची संधी उपलब्ध; जाणून घ्या अर्जासाठी पात्रता निकष…

DIAT Pune recruitment 2024 : वेतन

१. ज्युनियर रिसर्च फेलो

पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी दरमहा (एकत्रित) – ७,०००/- रुपये वेतन दिले जाईल.
तर तिसऱ्या वर्षासाठी दरमहा (एकत्रित) – ४२,०००/- रुपये वेतन दिले जाईल.

२. सीनियर रिसर्च फेलो

या पदासाठी दरमहा (एकत्रित) ४२,०००/- रुपये वेतन दिले जाईल.

३. प्रोजेक्ट असिस्टंट

या पदासाठी दरमहा (एकत्रित) २०,०००/- रुपये वेतन दिले जाईल.

DIAT Pune recruitment 2024 : अर्ज कसा करावा?

वरील कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
अर्ज ई-मेलद्वारे पाठवायचा आहे. त्यासाठी खाली दिलेल्या ई-मेल अॅड्रेसचा वापर करा.

ईमेल अॅड्रेस – brazilraj.a@diat.ac.in

अर्ज करताना उमेदवाराने स्वत: माहिती व्यवस्थित भरावी. कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविला जाईल. त्याची नोंद इच्छुक उमेदवाराने घ्यावी.
तसेच दिलेल्या अर्जासह आवश्यक ती कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख २१ फेब्रुवारी २०२४ अशी ठेवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील कोणत्याही पदासाठी अर्ज करायचा असल्यास अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणेच्या [Defence Institute of Advanced Technology, Pune] अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइट आणि अधिसूचना या दोन्हीची लिंक वर दिलेली आहे.