RBI Grade B Officer Recruitment 2023: रिझर्व्ह बॅंकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आरबीआयद्वारे लवकरच २९१ जागांसाठी नव्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या rbi.org.in. या अधिकृत वेबसाइटवर भरतीसंबंधित माहिती उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांमध्ये भरतीसाठी अ‍ॅप्लिकेशन लिंक अ‍ॅक्टिव्ह होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आरबीआयच्या भरतीमध्ये ग्रेड बी ऑफिसर पदाच्या २९१ जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ९ मे २०२३ रोजी सुरुवात होणार आहे. तसेच ९ जून २०२३ हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. या एका महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरुन दाखल करावा लागणार आहे. ग्रेड बी ऑफिसर होण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा आणि अन्य निकष याबाबतची माहिती आरबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेतली जाईल आणि सर्वात शेवटी मुलाखतीनंतर योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. जून महिन्यामध्ये ऑनलाइन परिक्षा, जुलैमध्ये दुसऱ्या स्तरावरील परीक्षा आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मुलाखत असा या भरती परीक्षेचा क्रम असू शकतो.

आणखी वाचा – BPSC Recruitment 2023: गृह मंत्रायलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, ग्रॅज्युएट करू शकतात अर्ज, मिळेल चांगला पगार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना ठराविक रक्कम प्रवेश शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. Open आणि OBC या गटामध्ये असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज करताना ८५० रुपये घेतले जातील. तर SC,ST आणि PWD या गटातील उमेदवार १०० रुपये प्रवेश शुल्क भरुन अर्ज करु शकतात.