रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) (RBI आपल्या मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि दिल्ली रिजन अंतर्गत येणाऱ्या ४ झोन्समध्ये) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हील/ इलेक्ट्रिकल) पदांची भरती करणार आहे. एकूण रिक्त पदे – ११. मुंबई विभागातील RBI ची कार्यालये West Recruitment Zone अंतर्गत येतात.

(१) ज्यु. इंजिनिअर (सिव्हील) – एकूण ७ (३) पदे (वेस्ट झोनमधील पदे – एकूण – ४(१) (अज – १(१), इमाव – १, खुला – २); प्रत्येकी १(१) पद दिव्यांग कॅटेगरी B( D/ HH) आणि C( LD/ CP etc.) साठी राखीव).

(२) ज्यु. इंजिनिअर (इलेक्ट्रिशियन) – एकूण ४(२) पदे (वेस्ट झोनमधील पदे – एकूण – ३(२) – (अज – २(२), खुला – १) (१(१) पद दिव्यांग कॅटेगरी C( LD/ CP etc.) साठी राखीव).

रिक्त पदांबरोबर कंसात दिलेली पदे ही बॅकलॉगमधील आहेत.

अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग/ ईडब्ल्यूएस् कॅटेगरीचे उमेदवार जरी रिक्त पदे राखीव नसल्यास अर्ज करण्यास पात्र आहेत. रिक्त पदे नसल्यास त्यासाठी असलेले आरक्षणाचे फायदे त्यांना घेता येणार नाहीत.

पात्रता : (दि. १ डिसेंबर २०२४) रोजी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/ दिव्यांग – ५५ टक्के) आणि संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/दिव्यांग – ४५ टक्के) आणि संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

ज्यु. इंजिनिअर इलेक्ट्रिकल पदांसाठी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदविका/पदवीधारक उमेदवारसुद्धा पात्र आहेत.

वयोमर्यादा : दि. १ डिसेंबर २०२४ रोजी २० ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे; पुनर्विवाह न केलेल्या विधवा/ घटस्फोटित/ कायद्याने विभक्त महिला – ३५ वर्षे, अजा/ अज – ४० वर्षे).

CGPA/ OGPA/ CPI किंवा तत्सम गुणांकन पद्धत असल्यास १० पॉईंट स्केलवर ६.७५ चे सरासरी ६० टक्के गुण, ६.२५ चे सरासरी ५५ टक्के गुण व ५.७५ चे सरासरी ५० टक्के गुण पकडले जातील.

निवड पद्धती : ऑनलाइन एक्झामिनेशन आणि ( i) लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट (LPT)

३०० गुणांची ऑनलाइन टेस्ट ८ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतली जाईल. (१) इंग्लिश लँग्वेज – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४० मिनिटे. (२) इंजिनीअरिंग डिसिप्लिन पेपर-१ – ४० प्रश्न, १०० गुण, वेळ ४० मिनिटे. (३) इंजिनीअरिंग डिसिप्लिन पेपर-२ – ४० प्रश्न, १०० गुण, वेळ ४० मिनिटे. (४) जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे. एकूण १८० प्रश्न, ३०० गुण, वेळ १५० मिनिटे. परीक्षेचा अभ्यासक्रम www. rbi. org. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

( ii) लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ( LPT) – जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण करतील, त्यांनी ज्या झोनमधील पदांसाठी अर्ज केला आहे, तेथील स्थानिय भाषेतील लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. वेस्ट झोनसाठी मराठी, गुजराती, कोकणी या स्थानिय भाषा नेमून दिलेल्या आहेत.

लेखी परीक्षा अंदाजे ८ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित केली जाईल.

परीक्षा केंद्र : अहमदाबाद/गांधीनगर, पुणे, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR, पणजी इ.

परीक्षा शुल्क – अजा/अज/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ५०/- GST; खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस् – रु. ४५०/- + GST.

शंकासमाधानासाठी http:// cgrs. ibps. in/ या लिंकवर संपर्क साधावा. विषयात Recruitment of Junior Engineer (Civil/ Electrical) PY २०२४ असे नमूद करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज www. rbi. org. in या संकेतस्थळावर दि. २० जानेवारी २०२५ पर्यंत करावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन अर्जासोबत उमेदवाराचा फोटोग्राफ, सिग्नेचर, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.
suhassitaram@yahoo.com