१० वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे विभागात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण रेल्वे कोच फॅक्टरी (RCF) येथे काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२३ आहे. तर ही भरती कोच फॅक्टरीच्या एकूण ५०५ पदांसाठी करण्यात येणार आहे. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्कासह इतर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

RCF भरती २०२३ साठीची अर्ज फी –

रेल्वे कोच फॅक्टरी भरती २०२३ साठी अर्ज फी सर्वसाधारण OBC EWS श्रेणीतील मुलांसाठी १०० इतकी असेल. याशिवाय, SC ST PWD कामाच्या ईमेलसाठी अर्ज शुल्क ठेवण्यात आलेले नाही, फी ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

हेही वाचा- १० वी पास आणि ITI उमेदवारांना भारतीय नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी; अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

या भरतीसाठीची सविस्तर आणि अधिकच्या माहितीसाठी https://rcf.indianrailways.gov.in/ या बेवसाईटला अवश्य भेट द्या.

वयोमर्यादा –

रेल्वे कोच फॅक्टरी भरती २०२३ साठी वयोमर्यादा १५ ते २४ वर्षादरम्यान ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता –

  • मान्यताप्राप्त संस्थेतून १० वी पास असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक.

निवड प्रक्रिया –

हेही वाचा- सैनिक व्हायचंय? ‘असं’ मिळेल सैनिक शाळेत अ‍ॅडमिशन, फॉर्म आणि शुल्कबाबत जाणून घ्या सविस्तर

  • १० वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करणे
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

असा करा अर्ज –

हेही वाचा- मंदीदरम्यान नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ भारतीय कंपनी २५ हजार लोकांना देणार नोकरी; जाणून घ्या तपशील

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर Recruitment वर क्लिक करा.
  • Apply Online वर क्लिक करा.
  • अर्जात दिलेली सर्व माहिती अचूक भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अर्ज फी भरा.
  • त्यानंतर committee बटणावर क्लिक करा.
  • अर्जाची एक प्रिंट काढा आणि तुमच्याजवळ ठेवा
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcf recruitment 2023 big opportunity for 10th passers to work in railways bumper recruitment for this posts jap
First published on: 03-03-2023 at 09:45 IST