Konkan Railway Recruitment 2023 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकण रेल्वे भरती २०२३

पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस

एकूण रिक्त पदे – १९०

शैक्षणिक पात्रता –

पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग.

जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी.

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

हेही वाचा- ७ वी आणि १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांसाठी भरती सुरु

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये.
  • मागासवर्गीय/ महिला/ EWS – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक.

अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ नोव्हेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1atglxF-34KOm8ykZPs8WpzZhzFWTFiL2/view

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment for apprentice posts in konkan railway has started graduates engineers and diploma candidates can apply jap
First published on: 17-11-2023 at 19:53 IST