SBI Recruitment 2023: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये काम करायची इच्छा असणाऱ्यांची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एसबीआयद्वारे लवकरच स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी नव्या उमेदवारांची भरती केली जाणार आहे. स्टेट बॅंकेच्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २९ एप्रिल रोजी सुरु झाली असून १९ मे हा अर्ज करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे.

स्पेशलिस्ट ऑफिसर्ससाठीच्या भरतीसंबंधित सविस्तर माहिती एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरु शकतात. एसबीआयच्या भरतीमध्ये १८२ नियमित पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. याव्यतिरिक्त ३५ उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नोकरीवर ठेवण्यात येईल. नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि अन्य महत्त्वपूर्ण निकष याबद्दलची माहिती वेबसाइट तसेच एसबीआयने सादर केलेल्या पत्रकाद्वारे मिळवता येईल.

स्टेट बॅंकेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठीची निवड प्रक्रिया

स्टेट बॅंक ऑफ इंडियाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठीची भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर पुढे शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत यांद्वारे उमेदवार निवडले जातील. बॅंकेच्या शॉर्टलिस्टिंग कमिटीने तयार केलेल्या मापदंडांमध्ये बसणारे उमेदवार पहिल्या फेरीत निवडले जातील. पुढे त्यांना स्टेट बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मुलाखत द्यावी लागेल. मुलाखतीच्या परीक्षेला १०० गुण असतील. गुणांनुसार उमेदवारांची नोकरी मिळेल की नाही हे ठरेल.

आणखी वाचा – फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होतेय भरती; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता आणि निकष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना Open/OBC/ EWS या गटांमधील उमेदवारांना ७५० रुपये प्रवेश शुल्क म्हणून भरावे लागतील. तर SC/ ST/PWD या गटांत येणारे उमेदवार मोफत अर्ज करु शकतात.