NVS Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समिती (NVS) म्हणजेच (भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत एक स्वायत्त संस्था) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी https://navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता. तर, अर्ज करण्यापूर्वी रिक्त पदे आणि पदसंख्या, वयोमर्यदा, अर्ज कसा करायचा याबद्दल अधिक जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या –
नवोदय विद्यालय समितीच्या अंतर्गत कनिष्ठ सचिवालय सहायक, महिला कर्मचारी परिचारिका, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, मेस हेल्पर, एमटीएस या रिक्त पदांच्या १३७७ जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता –

उमेदवारांनी वयोमर्यदा व शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या पीडीएफमध्ये तपासून घ्यावी.

लिंक – https://drive.google.com/file/d/13Bmx_j0hDt6WgwG1mPG1ei9tQ5LnxtFc/view

खाली दिलेल्या लिंकद्वारे उमेदवार थेट अर्ज करू शकतात.

लिंक – https://nvs.ntaonline.in/

हेही वाचा…RPF Recruitment 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स

अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम -https://navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • भरती प्रक्रियेंतर्गत एका पदासाठी प्रत्येक उमेदवार फक्त एकच अर्ज करू शकतो ही बाब लक्षात घ्या.
  • नंतर अधिकृत वेबसाइटवरील भरती पोर्टलमध्ये लॉग इन करा.
  • उमेदवाराने फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लिंकवर अपलोड करावीत.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक ती माहिती भरून प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करावी आणि त्याची प्रिंटआउटसुद्धा घ्यावी.

निवड प्रक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पदांसाठीची निवड प्रक्रिया परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारावर पार पडेल. वेगवेगळ्या पदांप्रमाणे आधारित मुलाखत व चाचणी घेतली जाईल. तर अशा प्रकारे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी ३० एप्रिलपूर्वी अर्ज करू शकतात.