Government Job: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. विशेष म्हणजे उत्तराखंड लोकसेवा आयोगात नोकरी करण्याची ही संधी तुम्हाला मिळणार आहे. ज्या उमेदवारांना उत्तराखंड संयुक्त राज्य (नागरी) वरिष्ठ सेवा परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे ते UKPSC च्या psc. .uk.gov.in. अधिकृत वेबसाइटवर थेट अर्ज करु शकतात. या भरती प्रक्रियेत १८९ पदे भरली जातील. चला तर मग याची पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील जाणून घेऊ.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख: मार्च १४ २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ एप्रिल २०२४

रिक्त जागा तपशील

  • उपजिल्हाधिकारी: ८ पदे
  • पोलीस उपअधीक्षक: १७ पदे
  • जिल्हा कमांडंट: ५ पदे
  • सहाय्यक विभागीय परिवहन अधिकारी: १ जागा
  • जिल्हा पंचायत राज अधिकारी: १ पद
  • कार्यकारी अधिकारी, जिल्हा पंचायत: १ पदे
  • जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी: ६ पदे
  • उपशिक्षणाधिकारी/कर्मचारी अधिकारी/कायदा अधिकारी: ५८ पदे
  • प्रोबेशन ऑफिसर: १ जागा
  • वित्त अधिकारी/कोषागार अधिकारी: १४ पदे
  • सहाय्यक आयुक्त, राज्य कर: १६ पदे
  • राज्य कर अधिकारी: ५३ पदे
  • सहाय्यक महापालिका आयुक्त/कार्यकारी अधिकारी: ७ पदे

पात्रता निकष

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

  • अर्ज फी
  • सामान्य/ OBC/ EWS/ इतर राज्य: १७२.३० रुपये
  • SC/ST: ८२.३० रुपये
  • PWD: २२.३० रुपये

हेही वाचा >> शिकाऊ उमेदवारासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; इतका पगार मिळणार; जाणून घ्या अर्ज कसा भरावा…

अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार UKPSC ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.