इन्स्टिटय़ूट ऑफ रेल ट्रान्सपोर्ट, नवी दिल्ली द्वारा दूरस्थ शिक्षण पद्धतीने घेण्यात येणाऱ्या खालील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट (कंटेनरायझेशन) अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटमधील पदविका अभ्यासक्रम –

रेल ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट विषयातील पदविका अभ्यासक्रम –

अभ्यासक्रमाचा कालावधी – वरील दोन्ही पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी एक वर्षांचा आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत वा त्यांनी तीन वर्षे कालावधीची इंजिनीअरिंगमधील पदविका पात्रता पूर्ण केलेली असावी.

अभ्यासक्रमाचे परीक्षा केंद्र – टपालाद्वारे उपलब्ध असणाऱ्या या अभ्यासक्रमाचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई या परीक्षा केंद्राचा समावेश असेल.

अर्ज व माहितीपत्रक – अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास २०० रु. चा इन्स्टिटय़ूट ऑफ रेल मॅनेजमेंटच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह इन्स्टिटय़ूट ऑफ रेल मॅनेजमेंट, रूम नं. १०४, नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रोजेक्ट युनिट, शिवाजी ब्रिज, शंकर मार्केटमागे, आयआरडब्ल्यूए ऑफिस, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठवावा.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दूरध्वनी क्र. ०११- २३४१६८३२, २३२१४३६२ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.irt-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज इन्स्टिटय़ूट ऑफ रेल ट्रान्सपोर्ट लायब्ररी अ‍ॅण्ड स्टडी सेंटर, निअर टिळक ब्रीज रेल्वे स्टेशन, महावत खान रोड, नवी दिल्ली- ११०००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०१७.