News Flash

ईमेल कसा वापरावा

बरेच लोक या संकेतस्थळांवर आपले ईमेल अकाउंट तर बनवतात, मात्र त्याचा वापर करता येत नाही.

 

इंटरनेटवरील याहू, रेडिफ, जीमेल अशी अनेक संकेतस्थळे ‘ईमेल’ सेवा पुरवीत असतात. ईमेलवरून आपण एखादी माहिती सहज मिळवू अथवा पाठवू शकतो. बरेच लोक या संकेतस्थळांवर आपले ईमेल अकाउंट तर बनवतात, मात्र त्याचा वापर करता येत नाही.

  • संकेतस्थळावर निर्देश केलेल्या ठिकाणी आपला अचूक युजर आय.डी. आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपले अकाउंट ओपन होते.
  • त्यात मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये असतात तसे इनबॉक्स, आउटबॉक्स आपण बघू शकतो.
  • इनबॉक्समध्ये आपल्याला आलेले ईमेल, आउटबॉक्समध्ये आपण पाठविलेले ईमेल्स असतात.
  • त्याव्यतिरिक्त राईट मेल अथवा कंपोज मेल असा एक ऑप्शन असतो, त्यात जाऊन आपल्याला ज्या पत्त्यावर म्हणजेच ईमेल आयडीवर ईमेल पाठवायचा आहे तो अचूक पत्ता टाकून, त्याला समर्पक शीर्षक म्हणजे सबजेक्ट द्यावे.
  • खाली चौकटीत दिलेल्या जागी मजकूर लिहावा. ईमेलसोबत एखादी फाईल अथवा फोटो पाठविण्याचीही व्यवस्था असते. सर्व गोष्टी अचूकपणे भरल्यानंतर ‘सेंट’च्या ऑप्शनवर क्लिक केली की ईमेल तत्काळ पाठविला जातो. तसा मेसेजही डिस्प्ले होतो.
  • पाठविलेला ईमेल ‘सेंट आयटम्स’मध्ये दिसला की ईमेल पोहोचला असे समजण्यात येते. ईमेल सेवेचे वैशिष्टय़ म्हणजे जगात कुठूनही कुठेही सहजपणे तत्काळ माहिती, पत्र पाठविता येते आणि ही सेवा मोफत उपलब्ध आहे, फक्त इंटरनेट सेवेचाच खर्च येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:06 am

Web Title: how to use email
Next Stories
1 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा- २०१७
2 नोकरीची संधी
3 पुढची पायरी : कार्यालयातील कुहुकुहु
Just Now!
X