आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील ‘सुरक्षा’ या घटकाची परीक्षाभिमुख र्सवकष तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. सुरक्षा या विषयाची व्याप्ती मोठी आहे, भारताला बाह्य़ व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बाह्य़ सुरक्षा म्हणजे परकीय राष्ट्राकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणापासून सुरक्षा करणे होय व अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमांतर्गत असणारी सुरक्षा ज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था व देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणे इत्यादी येते. भारतामध्ये अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयावर आहे आणि बाह्य़ सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्रालयावर आहे.

दीर्घकालापासून जम्मू आणि काश्मीर हे राज्य दहशतवाद आणि दहशतवादी कारवायाने ग्रासलेले आहे, तसेच ईशान्येकडील राज्ये घुसखोरी व वांशिक चळवळी, संघटित गुन्हेगारी, सीमेपलीकडून अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी इत्यादी समस्यांनी त्रस्त आहेत. सद्य:स्थितीमध्ये देशाच्या अनेक राज्यामध्ये दहशतवाद आणि दहशतवादी कारवाया घडत आहेत. धार्मिक दंगे, भाषिक वाद, राज्य-राज्यांतर्गत असणारे वाद, नवीन तंत्रज्ञान अर्थात मोबाइल, इंटरनेट, सोशल नेटवìकग साइट्सद्वारे एखाद्या विशिष्ट द्वेषपूर्ण विचारसारणीचा प्रसार करणे यांसारख्या घटना घडत आहेत. या समस्या देशाच्या विविधतेतील एकता आणि अखंडतेला बाधा पोहोचवत आहेत ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेला प्रचंड आव्हान निर्माण झालेले आहे.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

सर्वप्रथम आपण सुरक्षा या घटकांमधील नमूद मुद्दय़ाचा थोडक्यात आढावा घेऊ. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बाह्य़ आणि अंतर्गत सुरक्षासंबंधी मुद्दय़ाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यामध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमासंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि त्याचे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्य-राज्यांतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा संबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेटवìकग साइट्स याचा वापर, याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला संभवणारा धोका, सुरक्षिततेपुढील नवी आव्हाने इत्यादी बाबी आणि याच्या जोडीला या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश यात आहे. याचबरोबर देशाची बाह्य़ आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे याची माहिती असणे आवश्यक आहे. २०१३ ते २०१७मध्ये झालेल्या पाच मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर २०१३ मध्ये पाच, २०१४ मध्ये पाच, २०१५ मध्ये चार, २०१६ मध्ये चार आणि २०१७ मध्ये चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यातील कांही प्रश्न खालीलप्रमाणे होते –

अवैध पसा हस्तांतरण देशाच्या आíथक सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी एक धोका आहे. भारतासाठी याचे काय महत्त्व आहे आणि बाह्य़ धोक्यापासून वाचण्यासाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे? (२०१३)

भारताचे बहुधार्मिक आणि बहुवांशिक विविधतापूर्ण समाजस्वरूप हे शेजारील देशामध्ये पाहावयास मिळणाऱ्या मूलतत्त्ववादी प्रभावापासून मुक्त नाही. यांसारख्या वातावरणाचा प्रतिकार करण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या उपायांची रणनीतीसह चर्चा करा. (२०१४)

डिजिटल मीडियासारख्या माध्यमातून धार्मिक उपदेशाच्या परिणामस्वरूप भारतीय युवक इसिस (ISIS) मध्ये सहभागी होत आहेत. इसिस हे काय आहे आणि याचे ध्येय  काय आहे? इसिस हे आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला कशा प्रकारे धोका पोहोचवू शकते? (२०१५)

दुर्गम भूभाग आणि कांही देशासोबत असणाऱ्या शत्रुतापूर्ण संबंधामुळे सीमा व्यवस्थापन हे एक कठीण कार्य बनलेले आहे. प्रभावी सीमा व्यवस्थापन आणि रणनीतीवर प्रकाश टाका. (२०१६)

भारतात जमावाची हिंसा एक गंभीर कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या म्हणून उदयास येत आहे. योग्य उदाहरणे देऊन, यांसारख्या हिंसेची कारणे आणि परिणामाचे विश्लेषण करा. (२०१७)

याव्यतिरिक्त डिजिटल सशस्त्र दलाची आवश्यकता, चीन आणि पाकिस्तान आíथक माíगका आणि यामुळे भारताच्या सुरक्षेला असणारा धोका, सोशल नेटवìकग साइट्स, सायबरस्पेस आणि २०१३चे राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण, दहशतवाद आणि पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरीची समस्या, इत्यादी घटकावरही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जे चालू घडामोडींचा संबंध जोडून विचारलेले आहेत. उपरोक्त प्रश्नावरून असे दिसून येते की या घटकांचे मूलभूत ज्ञान आधी मिळवायला हवे. कारण प्रश्नांमध्ये मूलभूत ज्ञानासह चालू घडामोडीशी सांगड घालून विश्लेषणात्मक तसेच समीक्षात्मक आकलनावर जोर देण्यात आलेला आहे. त्यामुळे विषयाच्या सर्वागीण माहितीचे आकलन केल्याशिवाय प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येत नाही. यावरून असे समजते की, सुरक्षा या घटकाची तयारी करताना देशाच्या अंतर्गत आणि बाह्य़सुरक्षेच्या समोर नेमकी कोणती आव्हाने आहेत? यापासून देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला नेमका कोणता धोका आहे? आणि या आव्हानांना यशस्वीरीत्या परतवून लावण्यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? इत्यादी बाबींचा एकत्रितपणे विचार करून या घटकाची तयारी करणे अपेक्षित आहे.

या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भ वापरावेत याचा आढावा आपण घेऊ. या घटकावर नोट्स स्वरूपातील अनेक गाइड्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासता येते. तसेच याच्या जोडीला  दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे दहशतवाद आणि नक्षलवाद यावरचे अहवाल पाहावेत. या घटकाचा चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ ही इंग्रजी दैनिके, योजना आणि वर्ल्ड फोकस ही मासिके आणि परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, IDSA यांच्या वेबसाईट्सचा वापर करावा.