25 February 2021

News Flash

जवानांच्या सतर्कतेमुळे जम्मू काश्मीरमध्ये टळला पुलवामासारखा मोठा हल्ला

अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यानं ठोकला पळ

संग्रहित छायाचित्र, फोटो सौजन्य-पीटीआय

दहशतवाद्यांच्या पुलावामासारख्या हल्ल्याची योजना लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे टळल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामानजीक एका सँट्रो गाडीमध्ये IED (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आले होते. दरम्यान, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं वेळेत हा बॉम्ब निकामी केल्यानं मोठा अनर्थ टळला.

लष्कर, सीआरपीएफ आणि पुलवामा पोलिसांनी एकत्ररित्या या गाडीची ओळख पटवली. तसंच या गाडीत IED असल्याचा शोधही घेतला. त्यानंत बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला त्वरित घटनास्थळी बोलावण्यात आलं. त्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं त्वरित तो बॉम्ब निकामी केला आणि मोठा अनर्थ टाळला.

एक दहशतवादी ही गाडी चालवत होता. परंतु सुरूवातीला करण्यात आलेल्या गोळीबारानंतर तो गाडी सोडून पळून गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यानं त्या ठिकाणाहून पळ ठोकला. दरम्यान, हे प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात येणार आहे. ही गाडी पुलवामातील रजपुरा रोडनजीक असलेल्या शादीपुरा येथून ताब्यात घेण्यात आली. पांढऱ्या रंगाच्या या गाडीला दुचाकीची नंबर प्लेट लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडीची कठुआमध्ये नोंदणी केल्याची माहितीही समोर आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही गाडी ट्रॅक केली आणि त्यानंतर यात बॉम्बचा शोध घेण्यात आला. बॉम्ब निकामी करण्यापूर्वी जवळपासचा परिसरही रिकामा करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 10:01 am

Web Title: a major incident of a vehicle borne ied blast averted by the timely input jud 87
Next Stories
1 … म्हणून वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना देणार ७५ हजार रुपये; गुगलचा ‘सुंदर’ निर्णय
2 धक्कादायक निष्कर्ष: करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहा फुटांचं अंतरही पुरेसं नाही
3 भारतात चोवीस तासांत ६,५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू
Just Now!
X