24 January 2021

News Flash

हवाई दलाचं मिग 27 हे लढाऊ विमान जैसलमेरमध्ये कोसळलं

पायलटनं पॅराशूटच्या मदतीने उडी मारून वाचवले स्वतःचे प्राण

प्रतिकात्मक छायाचित्र

हवाई दलाचं मिग 27 हे लढाऊ विमान राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी कोसळलं. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. हे विमान प्रशिक्षण देण्यासाठी वापरलं जात होतं. प्रशिक्षण देतानाच ते कोसळलं अशीही माहिती समोर येते आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. विमान कोसळताना वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने उडी मारली, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. काही दिवसांपूर्वीच हवाई दलाचं मिराज 2000 हे विमानही कोसळलं होतं त्यापाठोपाठ आता मिग कोसळल्याचीही घटना घडली आहे.

जैसलमेर येथील एअरबेसवरून जेव्हा या विमानाने उड्डाण केलं त्यानंतर काही वेळातच हे विमान अपघातग्रस्त झालं.पायलटनं उडी मारून पॅराशूटच्या मदतीने स्वतःचे प्राण वाचवले. ही घटना कशी घडली याची चौकशी करण्यात येईल असं IAF च्या प्रवक्त्याने सांगितलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 7:58 pm

Web Title: a mig 27 aircraft crashed at the pokharan firing range however the pilot ejected safely
Next Stories
1 रिलायन्सवर राहुल गांधींचा हल्लाबोल, कोर्टात अनिल अंबानींना कपिल सिब्बल यांची मदत
2 ‘काँग्रेस बुडणारे राजघराणं, त्यांना वाचवण्यासाठी आणखी किती खोटं बोलणार’
3 पालक हो म्हणाले तरच प्रेमविवाह; १० हजार तरुण-तरुणींची शपथ
Just Now!
X