विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यातून सुटल्यानंतर शुक्रवारी मायदेशी परतले. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी एक खास ट्विट केला आहे. वो कोई और चिराग होते हैं जो हवाओंसे बुझ जाते हैं… हमने तो जलने का हुनर भी तुफानोसे सीखा है! असं म्हणत त्यांनी अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे असंही महिंद्रा यांनी म्हटलं आहे. तुमच्या पंखातलं बळ वाढवण्यासाठी अवघा देश तुमच्यासोबत आहे अशा आशयाच्या ओळीही त्यांनी पोस्ट केल्या आहेत.

आपल्याला ठाऊक आहेच की 28 तारखेला एक ट्विट करून त्यांनी प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाबाबत एक ट्विट करून प्रसारमाध्यमांचे कान टोचले. देशासाठी अभिनंदन यांची सुटका महत्त्वाची आहे ही बाब लक्षात घ्या असे आनंद महिंद्रानी म्हटले होते. शुक्रवारी अभिनंदन यांची सुटका होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे वृत्तांकन करताना ताळतंत्र बाळगा असा सल्लाच आनंद महिंद्रा यांनी दिला. त्यानंतर शुक्रवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी अभिनंदन मायदेशी परतले ज्यानंतर आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट करून या सगळ्या गोष्टींवर टीका केली आहे.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला ज्यानंतर खळबळ उडालेल्या पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीत शिरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वायुदलाने चोख प्रत्युत्तर देत ही विमानं पटळून लावली. याच दरम्यान अभिनंदन चालवत असलेले मिग 21 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. अभिनंदन यांनी स्वतःची सुटका करून घेतली. मात्र ते पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले आणि पाकिस्ताच्या तावडीत सापडले. अखेर 60 तासांनी त्यांची सुटका झाली आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी अभिनंदन यांच्याबद्दल गौरवोद्गारा काढले आहेत. तसे अभिनंदन यांचा अभिमान आहे असंही म्हटलं आहे.