News Flash

#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं Top Trending हॅशटॅग; मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याला होतोय विरोध

२०१५ साली राजकारणामध्ये जुमला हा शब्द सर्वात आधी अमित शाह यांनी वापरलेला

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला आंदोलनजीवी हा शब्द मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर चांगलाच चर्चेत आहे. सोमवारी मोदींनी राज्यसभेत दिलेल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. ‘आंदोलन मागे घ्या आणि चर्चेस या’, असं मोदी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना म्हणाले. मात्र त्याचवेळी त्यांनी आता आंदोलनजीवी म्हणजे व्यावसायिक आंदोलक उदयास आले असून तेच सर्व आंदोलनांमध्ये दिसत आहेत. हे परोपजीवी आंदोलक प्रत्येक आंदोलनावर पोसले जात आहेत, अशी टीकाही केली. मोदींनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या टीकेमुळे विरोधकांपासून ते शेतकरी आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी या शब्दावरुन मोदींवर टीका केली आहे. असाच एक हॅशटॅग सध्या सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. #आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं असा हा हॅशटॅग असून या हॅशटॅगवर ६० हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. हा बुधवारी (१० फेब्रुवारी २०२१) देशातील टॉप ट्विटर ट्रेण्ड ठरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी या शब्दामधून आंदोलन करणाऱ्यांना टोला लगावल्यानंतर आता आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी आम्ही आंदोलक असलो तरी खोटे दावे आणि आश्वासने देणारे नाहीत असं सांगणारा हा हॅशटॅग ट्रेण्ड केलाय. शेतकरी आंदोलनातील फोटो, व्हिडीओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स या हॅशटॅगच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी शेअर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

जुमला शब्द आधी अमित शाह यांनी वापरलेला

२०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१५ साली एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदा जुमला या शब्दाचा वापर केला होता. परदेशातील काळापैसा भारतात आणला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करता येतील हा निवडणुकीच्या प्रचारामधील जुमला म्हणजेच खोटं आश्वासन होतं असं शाह यांनी ५ फेब्रुवारी २०१५ रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर विरोधकांनी अनेकदा यावरुन भाजपावर टीका केल्याचे पाहायला मिळालं आहे. सध्या ट्रेण्ड होत असणारा हॅशटॅगही याच शब्दाची आठवण करुन देणारा आहे. पाहुयात व्हायरल झालेले काही ट्विट्स…

१) शेतकरी एकजुटीचा विजय असो…

२) तर आम्हाला गर्व आहे

३) वेगवेगळ्या ठिकाणांवरील आंदोलन

४) भाषणावरुन टोला

५) दोन्ही वक्तव्ये

६) आंदोलन हेच लोकशाहीचं सौंदर्य आहे

७) समर्थन आंदोलनाला

८) हे सुद्धा आंदोलकच

९) तुम्ही सुद्धा आंदोलनजीवी?

१०) काहींनी हा हिशेबही काढला

११) आम्ही शेतकऱ्यांसोबतच

१२) टॉप ट्रेण्ड

दरम्यान या हॅशटॅगबरोबरच अनेकांनी इतर शब्दांच्या पुढे जीवी शब्द लावत नवीन शब्द शोधून काढल्याचेही चित्र दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर अशापद्धतीचे अनेक ट्विट पाहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 11:52 am

Web Title: andolan jivi hu jumla jivi nahi trends top on twitter after pm modi use the word in speech scsg 91
Next Stories
1 औषधांवरील साडेसहा कोटींचा कर माफ; मुंबईतील चिमुकलीला पंतप्रधान मोदींनी केली मदत
2 दारु माफियाचा पोलिसांवर हल्ला, २४ तासांच्या आत पोलिसांनी केलं एन्काऊंटर
3 हो, भारत जागतिक शक्ती बनल्याचं अमेरिकनं केलं मान्य
Just Now!
X