‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’ हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी केजरीवालांची मोदींवर टीका
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी करारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना अटक करण्याचे धारिष्टय़ नरेंद्र मोदी यांच्यात नाही आणि दोन्ही पक्षांनी भ्रष्टाचारात आघाडी केली आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
मोदी यांच्या बनावट पदवी प्रकरणाबाबत काँग्रेससमोर केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला.
हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात भाजप सरकार सोनिया गांधी यांना अटक करणार नाही आणि मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा काँग्रेस उपस्थित करणार नाही, असा ‘करार’ दोघांमध्ये झाल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.
इटलीतील न्यायालयाच्या आदेशातही सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्यासह काही अधिकारी आणि काँग्रेसजनांची नावे आहेत, परंतु सोनिया गांधी यांना अटक करण्याइतके, त्यांना दोन प्रश्न विचारण्याइतके आणि त्यांची चौकशी करण्याइतके धारिष्टय़ मोदी यांच्यात नाही, असेही केजरीवाल म्हणाले.
मोदी, आपल्याला कारवाई करण्यासाठी पंतप्रधान करण्यात आले आहे, इटलीच्या न्यायालयावर कामगिरी सोपविण्यासाठी नव्हे. सोनिया यांना कारागृहात टाकल्यास आमची छातीही ५६ इंच होईल, परंतु मोदी म्हणतात, सोनियांचे नाव इटलीच्या न्यायालयाने घेतले आहे, आपण नव्हे. मोदी, आपण सोनियांना इतके का घाबरता, असा सवालही केजरीवाल यांनी केला. जंतरमंतर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.
भ्रष्टाचाऱ्यांना योग्य शासन केले जाईल, असे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले, मात्र हेलिकॉप्टर कराराच्या चौकशीत एक इंचभरही प्रगती झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत सरकारने या प्रकरणाची काय चौकशी केली, इटलीच्या न्यायालयाने तपास पूर्ण केला, न्यायालयात खटले दाखल केले, निकाल देण्यात आला आणि जे लाच देण्यात दोषी होते त्यांना कारागृहातही टाकण्यात आले.

मनोहर पर्रिकर यांचा गांधी कुटुंबीयांवर हल्ला
हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणावरून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी गांधी कुटुंबीयांवर हल्ला चढविला. गांधी कुटुंब दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास सरकार कचरणार नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असे पर्रिकर म्हणाले.

Bengluru
VIDEO : ‘जय श्री राम’ म्हटल्याने बंगळुरूमध्ये तिघांवर हल्ला, झेंडाही पळवला
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांना दिलासा, मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली