12 December 2019

News Flash

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची सुनावणी शीघ्रगतीने होण्याची भारताला अपेक्षा

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेने पाकिस्तानला फटकारल्याने या प्रकरणी पाकिस्तानात सुरू असलेल्या खटल्याची शीघ्रगतीने सुनावणी होईल आणि लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीझ सईद याच्यावर कारवाई होईल,

| October 26, 2013 04:12 am

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेने पाकिस्तानला फटकारल्याने या प्रकरणी पाकिस्तानात सुरू असलेल्या खटल्याची शीघ्रगतीने सुनावणी होईल आणि लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीझ सईद याच्यावर कारवाई होईल, अशी आशा भारताने व्यक्त केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना याबाबत जाब विचारल्याने त्याचा खटल्याच्या सुनावणीवर आणि सईदवर कारवाई करण्याबाबत चांगलाच परिणाम होईल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींवरील खटल्याच्या सुनावणीला अद्याप सुरुवात का झाली नाही, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि हाफीझ सईदच्या कारवाया याबाबत ओबामा यांनी शरीफ यांना थेट प्रश्न विचारल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान अस्वस्थ झाले.
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम हा सध्या पाकिस्तानात आहे. एफबीआयसमवेत आमची चर्चा सुरू असून अमेरिकेच्या मदतीने आम्ही दाऊदला लवकरच भारतात आणू, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

First Published on October 26, 2013 4:12 am

Web Title: barack obama asks nawaz sharif why 2611 trial has not started yet
Just Now!
X