बिहारमध्ये तीन टप्प्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभं केलं आहे. मतमोजणीनुसार, बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. मात्र त्याचवेळी या निवडणुकीमध्ये ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहे.

नक्की वाचा  >> Bihar Election : “फडणवीसांच्या प्रचारामुळेच बिहारमध्ये एनडीएला मिळालं यश”

भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवरीनुसार दुपारीपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपाला सर्वाधिक म्हणजेच २२ टक्क्यांहून अधिक मत राष्ट्रीय जनता दल पक्षाला मिळाली आहेत. त्याचबरोबरच १९ टक्क्यांहून अधिक मत भाजपाला मिळाली आहेत. त्या खाळोकाल जेडीयू १५ टक्के आणि काँग्रेसला ९ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे बिहारमध्ये निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक १.७४ टक्के मतं मिळाली आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणत महाविकास आघाडीची मोट बांधणाऱ्या राष्ट्रवादीलाही बिहारमध्ये फरसे यश मिळालेले नाही. राष्ट्रवादीला ०.२३ टक्के मतं मिळाली आहेत.


अद्याप मतमोजणी सुरु असली तरी अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार खूपच मागे पडले असून मतांची ही टक्केवारी वाढण्याची शक्यता अगदीच कमी आहे. शिवसेनेला नोटाहूनही कमी मते मिळाल्याची ट्विटवरही चर्चा आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्रातील मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष झाल्याचे पाहायला मिळालं होतं. याचवेळी शिवसेनेने बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता.