News Flash

बाबा रामदेव आणि योगी आदित्यनाथ आता थेट अभ्यासक्रमात

बशीर बद्र,जग्गी वासुदेव यांचाही समावेश

“अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” म्हणणाऱ्या बाबा रामदेव यांना आता योगातील तत्वज्ञ मानून त्यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा देखील आता अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापिठात आता विद्यार्थ्यी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ आणि रामदेब बाबा यांच्या विषयी अभ्यास करणार आहेत. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांव्यतिरिक्त बशीर बद्र, कुवर बैचेन, जग्गी वासुदेव यांचाही समावेश आहे.

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने नविन अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. नविन अभ्यासक्रमात योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या हठयोग या पुस्तकाबद्दल शिकवण्यात येणार आहे. या पुस्तकात योगी आदित्यनाय यांनी हठयोगाविषयी माहिती दिली आहे. योगींच्या पुस्तकाचे प्रकाशन गोरखनाथ ट्रस्टने केलं आहे. योगी यांचे विचार विद्यार्थ्यांना वेगळा रस्ता दाखवतील असं अभ्यास मंडळाचे म्हणणे आहे. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना सक्षम बनण्याची संधी मिळेल.

आणखी वाचा- उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग; भाजपा महासचिवांनी घेतल्या योगींसह मंत्र्यांच्या भेटी

अभ्यास मंडळाने रामदेव यांच्या योगाभ्यास आणि योग चिकित्सा रहस्य या पुस्तकांचा देखील अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या पुस्तकाच्या कलाशाखेच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. कलाशोखेच्या तत्वज्ञानच्या विषयात आता प्रॅक्टिकल आणि थेअरी अभ्यास असणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२१- २२ नुसार अभ्यासक्रम मंडळाच्या झालेल्या बैठकीत नविन अभ्यासावर शिक्कामोर्तब केलं आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला भारतातील सर्व क्षेत्रातील समृद्ध वारश्याविषयी माहिती यातून माहिती मिळणार आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे अशी माहिती डॉ. डीएन. सिंह यांनी दिली.

आणखी वाचा- “आता प्रवेश नाही, मुख्यमंत्री गेल्यावर या”; योगींच्या भेटीदरम्यान रुग्णालयाबाहेर नाकाबंदी करुन रुग्णांचीच अडवणूक

विद्यापीठाच्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात आर्यभट्ट, भास्कराचार्य, लीलावती,रामनुज,माधवाचार्य, स्वामी कृष्णतीर्थ यांच्या योगदानाविषयी माहिती देण्यात आली आहे. भौतिकशास्त्रात आर्यभटांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 12:23 pm

Web Title: books by ramdev and adityanath to be part of the philosophy syllabus at the meerut university abn 97
Next Stories
1 करोनामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; एकाच वेळी करावे लागले पाच जणांचे अंत्यविधी
2 मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र, केली ‘ही’ विनंती
3 मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून मद्याची होम डिलिव्हरी; दिल्ली सरकारने दिली परवानगी
Just Now!
X