नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी शुक्रवारी सीबीआयने दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम, त्यांचे पुत्र कार्ती यांच्यासह अन्य १५ जणांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार या सर्वानी गुन्हे केले असून त्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. विशेष न्यायाधीश लाल सिंह यांच्यासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

पीटर मुखर्जी, सनदी लेखापाल एस. भास्करमन, निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधूश्री खुल्लर, सूक्ष्म, मध्यम आणि लघुउद्योग खात्याचे माजी सचिव अनूप पुजारी, प्रबोध सक्सेना, रवींद्र प्रसाद, आयएनएक्स मीडिया, एएससीएल आणि चेस मॅनेजमेण्ट सव्‍‌र्हिसेस आदींचा आरोपपत्रामध्ये आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. अंतिम अहवालामध्ये इंद्राणी मुखर्जी यांचाही समावेश करण्यात आला आहे. पीसीए आणि भादंवितील कलमांनुसार अहवाल सादर करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहार २१ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी घेणार आहेत. चिदम्बरम यांच्या न्यायालयीन कोठडीत गुरुवारी न्यायालयाने २४ ऑक्टोबपर्यंत वाढ केली होती. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चिदम्बरम यांना कारागृहातच अटक करून चौकशी केली होती.