News Flash

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना अटक

हार्दिक पटेल यांना शनिवारी रात्री अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून अटक

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना 2015 च्या एका देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांना अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून अटक करण्यात आली. देशद्रोहाच्या प्रकरणात पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या एका न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरोधात शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सुनावणी दरम्यान हार्दिक पटेल सातत्याने अनुपस्थित राहिल्यामुळे अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती आहे. हार्दिक पटेलला आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाटीदार आरक्षण समर्थनार्थ 25 ऑगस्ट 2015 रोजी हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथे एक रॅली काढली होती. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. त्यावेळी पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी हार्दिक आणि सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 8:50 am

Web Title: congress leader hardik patel arrested for evading sedition case trial in ahmedabad sas 89
Next Stories
1 सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीस नकार देणे अशक्य- सिब्बल
2 सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे दलितविरोधी – शहा
3 दोषीच्या अल्पवयीन असल्याच्या दाव्यावर उद्या सुनावणी
Just Now!
X