News Flash

रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई-पुण्यात काय सुरु राहणार समजून घ्या…

केंद्र सरकारने आणखी दोन आठवडयांसाठी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

केंद्र सरकारने आणखी दोन आठवडयांसाठी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा तिसरा लॉकडाउन आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपणार आहे. आता १७ मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. करोना रुग्णांच्या संख्येनुसार सरकारने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन बनवले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करताना काही मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु सारखी महानगरांचा रेड झोनमध्ये समावेश होतो. लॉकडाउन कायम राहणार असला तरी रेड झोनमध्ये व्यापार, व्यवसायासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत.

– रेड झोनमधल्या व्यावसायिक आणि खासगी आस्थापनांना काम सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

– प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आयटी, माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा, कॉल सेंटर, शीतगृह गोदाम, खासगी सुरक्षा सेवा, सुरु राहणार आहेत.

– जीवनावश्यक वस्तुंची निर्मिती करणारे उत्पादन कारखाने, यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, ताग उद्योग, आयटी हार्डवेअरशी संबंधित उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 7:25 pm

Web Title: corona virus lock down what allowed in red zone dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Lockdown 3: कोणत्या झोनमध्ये कोणत्या गोष्टी सुरु राहणार आणि कोणत्या बंद?
2 देशात आता तिसरा लॉकडाउन : आणखी दोन आठवडे टाळेबंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3 मोदी सरकारचा मोठा निर्णय: अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी
Just Now!
X