News Flash

लसीकरण : नोंदणी सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच CoWIN चा सर्व्हर क्रॅश

१८ वर्षांवरील व्यक्तींची नाव नोंदणी २८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून सुरु झाली

केंद्र सरकारने एक मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करणार असून या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया आज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अ‍ॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले आहेत. इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास १७ कोटी ८८ लाख भारतीय आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करत होते. आरोग्य सेतू तसेच कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाल्याचे समजते.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

याआधीच्या टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं होतं. आता १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे.

१ मेपासून कोविशिल्डची किंमत वाढणार

गेल्या काही दिवसांमधअये केरळ, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनी १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात १८ वर्षांवरील सर्वांना करोनाची लस मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आली आहे. बुधवारी सिरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर करण्यात आले असून त्यानुसार १ मेपासून राज्य सरकारांना कोविशिल्ड लसीचा प्रत्येक डोस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना हेच डोस ६०० रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 4:22 pm

Web Title: cowin server is facing issues after registration starts for third phase of vaccination scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तरच मतमोजणी केंद्रात मिळणार प्रवेश; आयोगाचा निर्णय
2 केरळचा पत्रकार सिद्दीक कप्पनला दिल्लीला उपचारासाठी हलवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3 Lockdown in Goa : गोव्यात २९ एप्रिलपासून लॉकडाउन, सार्वजनिक वाहतूक बंद!
Just Now!
X