– केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना देशांतर्गत सुरक्षेची माहिती दिली. जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि नक्षलग्रस्त भागात सुरक्षेचे कोणते उपाय योजण्यात आले आहेत. दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची माहिती गोस्वामी यांनी मोदी यांना दिली.
– भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी गुजरात भवनमध्ये घेतली नरेंद्र मोदींची भेट. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर सुषमा स्वराज तातडीने मोदींच्या भेटीसाठी गुजरात भवनमध्ये दाखल झाल्या.
– वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी त्यांनीही मोदींची भेट घेतली
– मोदी मंगळवारी सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता
– अमित शाह आणि अरूण जेटलींनी घेतली नरेंद्र मोदींची भेट, संभाव्य मंत्रिमंडळातील नावांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
– मंत्रिमंडळात वर्णी लागावी, यासाठी भाजपचे काही खासदार संघाच्या दारी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील कार्यालयात गाठीभेटी
– उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनीही घेतली नरेंद्र मोदींची भेट
– गोपीनाथ मुंडे यांनी घेतली राजनाथसिंह यांची भेट
– शिवसेनेचे सर्व खासदार आज दिल्लीकडे
– उद्धव ठाकरे मंगळवारी नरेंद्र मोदींची भेट घेणार; राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार
– राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मंगळवारी नवी दिल्लीत बैठक; बैठकीत पुढील सरकारसंदर्भात चर्चा होणार
– राजधानी दिल्लीमध्ये गृहसचिव आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या प्रमुखानी गुजरात भवनमध्ये नरेंद्र मोदींची भेट घेतली
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2014 रोजी प्रकाशित
अंतर्गत सुरक्षेसंदर्भात केंद्रीय गृह सचिवांकडून मोदींना माहिती
नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या रचनेसंदर्भात राजधानी नवी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

First published on: 19-05-2014 at 11:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Developments in new delhi about narendra modi govt