जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. यात एका जवानाला वीरमरण आले, तर इतर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेजवळील केरन सेक्टरमधील चोकेन चौकीजवर बुधवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून ही चकमक सुरु झाली ती अद्यापही सुरु असल्याचे सूत्रांकडून कळते.
J&K: Encounter between Security forces and terrorists underway in Keran sector of Kupwara district. One Army jawan has lost his life.
— ANI (@ANI) November 22, 2017
सीमारेषेजवळ दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली असून कालच जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा भागात सुरक्षारक्षकांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हे तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. तसेच ते पाकिस्तानी नागरिक असल्याचेही उघड झाले आहे.
#Kupwara encounter UPDATE: One terrorist has been killed. two Army jawans have also been injured #JammuAndKashmir
— ANI (@ANI) November 22, 2017
हंदवाड्यातील मगम परिसरात हे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. तर सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी ट्विटरवरुन सुरक्षा दलाच्या या कामगिरी कौतुक केले होते.
गेल्या आठवड्यातही सुरक्षा दलांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झाकिर उर रहमान लख्वी याच्या पुतण्यासह लष्कर- ए- तोयबाच्या सहा दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले होते. यात हवाई दलाच्या गरुड कमांडो पथकातील एक जवान शहीद झाला होता. हाजिन येथे ही कारवाई करण्यात आली होती.