गेल्या दोन महिन्यांपासून देशात एकीकडे वाढत्या करोनाची चर्चा असताना दुसरी चर्चा होती ती ५ राज्यांमधल्या निवडणुकांची! देशात करोनाचं संकट आल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर निवडणूक आयोगाकडून निवडणुकांचं आयोजन करण्यात आलं होतं. करोनासंदर्भातले नियम पाळणं बंधनकारक करण्यात आल्यानंतर देखील अनेक ठिकाणी हे निर्बंध बिनबोभाटपणे धुडकावून प्रचारसभा घेण्यात आल्याचं देखील समोर आलं. देशातील करोनाची परिस्थिती केंद्र सरकारवर विविध राज्य सरकारांकडून होत असलेली टीका, वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेली करोनाची परिस्थिती, लस, रेमडेसिविरच्या वाटपामध्ये भेदभाव केला जात असल्याचे होणारे आरोप या सर्व पार्श्वभूमीवर या ५ राज्यांमधल्या निवडणुका म्हणजे भाजपाप्रणीत केंद्र सरकारसोबतच त्या त्या राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांसमोर देखील आव्हान होत्या. आज पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर पाचही राज्यांमधली मतदान प्रक्रिया संपली असून लागलीच एक्झिट पोल समोर आले आहेत. प्रत्येक राज्यामध्ये एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे अंदाज वर्तवताना दिसत आहेत.

Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
Bhatrihari Mahtab recently joined the BJP after leaving the Biju Janata Dal
भाजप – बिजद यांच्या मैत्रीपूर्ण संघर्षांत कुणाची सरशी?
Lok Sabha elections in Telangana between Congress and BJP
तेलंगणमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यात चुरस

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता राज!

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी विरुद्ध भाजपा असाच थेट सामना यंदा निवडणुकीत दिसून आला. या निवडणुकीत सर्वांनीच एक्झिट पोलमध्ये ममता दीदींनाच पुन्हा पसंती दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ पैकी बहुमतासाठी १४८ जागांची आवश्यकता आहे.

ETG Research

तृणमूल – १६४ ते १७६
भाजपा – १०५ ते ११५
काँग्रेस-डावे – १० ते १५

P-MARQ

तृणमूल – १५२ ते १७२
भाजपा – ११२ ते १३२
काँग्रेस-डावे – १० ते २०

ABP C-Voter

तृणमूल – १५२ ते १६४
भाजपा – १०९ ते १२१
काँग्रेस-डावे – १४ ते २५

CNN News18

तृणमूल – १६२
भाजपा – ११५
काँग्रेस-डावे – १५

Republic TV-CNX

तृणमूल – १२८ ते १३८
भाजपा – १३८ ते १४८
काँग्रेस-डावे – ११ ते २१

“मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि भविष्यात दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवीन”

तमिळनाडूमध्ये फासे फिरणार!

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतादीदींनाच एक्झिट पोलने पडती बाजू दिली असली, तरी तमिळनाडूमध्ये मात्र फासे फिरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा २३४ जागांच्या तमिळनाडू विधानसभेत यंदा बहुमतासाठीच्या ११८ जागा द्रमुक पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Republic TV-CNX

अद्रमुक आघाडी – ५८ ते ६८
द्रमुक आघाडी – १६० ते १७०
एएमएमके आघाडी – ४ ते ६

P-MARQ

अद्रमुक आघाडी – ४० ते ६५
द्रमुक आघाडी – १६५ ते १९०
एएमएमके आघाडी – १ ते ३

मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग; विजयी मिरवणुकांवर बंदी

आसाममध्ये भाजप वरचढ!

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये प्रतिष्ठेची निवडणूक करणाऱ्या भाजपाला बाजूच्या आसाममध्ये सत्ता राखण्यात यश येणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. आसामच्या १२६ जागांपैकी ६४ जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत.

ABP C-Voter

एनडीए – ५८ ते ७१
काँग्रेस आघाडी – ५३ ते ६६
इतर – ० ते ५

P-MARQ

भाजपा आघाडी – ६२ ते ७०
काँग्रेस आघाडी – ५६ ते ६४
इतर – ० ते ४

India Today-Axis My India

भाजपा आघाडी – ७५ ते ८५
काँग्रेस आघाडी – ४० ते ५०
इतर – १ ते ४

Republic-CNX

भाजपा आघाडी – ७४ ते ८४
काँग्रेस आघाडी – ४० ते ५०
इतर – १ ते ३

भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम सापडल्याने पुन्हा होणार मतदान…

केरळमध्ये डाव्यांचीच सरशी!

दरम्यान, १४० जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचीच पुन्हा सरशी होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये बहुमतासाठी ७२ जागा आवश्यक आहेत.

India Today-Axis My India

एलडीएफ – १०४ ते १२०
युडीएफ – २० ते ३६
एनडीए – ० ते २

Republic-CNX

एलडीएफ – ७२ ते ८०
युडीएफ – ५८ ते ६४
एनडीए – १ ते ५

पुद्दुचेरीमध्ये भाजपाला कौल!

दरम्यान, केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये भाजपाप्रणीत एनडीएच्या पारड्यात मतदारांनी कौल दिल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. ३० जागांच्या पुद्दुचेरी विधानसभेमध्ये बहुमतासाठी अवघ्या १६ जागांची आवश्यकता आहे.

Republic-CNX

एनडीए – १६ ते २०
एसडीए – ११ ते १३
इतर – ०

ABP-C Voter

एनडीए – १९ ते २३
एसडीए – ६ ते १०
इतर – १ ते २