कर्जबुडव्या नीरव मोदीला वाचवण्यासाठी काँग्रेसने कायमच प्रयत्न केले असा आरोप भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांचाही बचाव काँग्रेसने सोयीस्कररित्या केल्या. काँग्रेसमध्ये गेलेले माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांनी त्या काळात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले असाही आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला. तसंच सध्याच्या घडीला जेव्हा नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीला परत आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत अशातही काँग्रेस नीरव मोदीला वाचवण्याच्या प्रय़त्नात आहे असं प्रसाद यांनी म्हटलं आहे.

“सध्याच्या घडीला नीरव मोदीला वाचवण्यासाठी सध्या काही निवृत्त न्यायाधीश काँग्रेसतर्फे कार्यरत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे” असंही प्रसाद यांनी म्हटलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अटक करण्यात आली आहे तेव्हा काँग्रेसमधे असलेले रिटायर्ड जज विरोधात बोलत आहेत. असं म्हणत त्यांनी अभय ठिपसेंवर टीका केली आहे.