News Flash

गुजरातमध्ये वैज्ञानिकांचा Covid-19 वर महत्वाचा शोध, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

करोना व्हायरसची उत्पत्ती कशी झाली? त्यावर कुठली लस, औषध प्रभावी ठरेल? यावर प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत.

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसवर जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. या व्हायरसची उत्पत्ती कशी झाली? त्यावर कुठली लस, औषध प्रभावी ठरेल? यावर जगभरातील प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. यामध्ये भारतातील जीबीआरसीने Covid-19 संदर्भात महत्वाची माहिती शोधून काढली आहे.

Covid-19 वरील संशोधनात गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिकांना महत्वाची माहिती मिळाली आहे. त्यांनी Covid-19 विषाणूच्या जीनोम साखळीची माहिती मिळवली आहे. भविष्यातील संशोधनाच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत महत्वपूर्ण ठरु शकते.

 

जीनोम साखळीमुळे Covid-19 विषाणूची उत्पत्ती कशी झाली, त्यावर कुठले औषध किंवा लस बनवता येईल आणि हा विषाणू कितपत त्रासदायक ठरु शकतो या संशोधनामध्ये भविष्यात मदत होईल. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या संशोधनाबद्दल गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो असे टि्वटमध्ये रुपानी यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 11:29 am

Web Title: gbrc scientists find covid19 whole genome sequence dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Video: पोलिसांनी रस्त्यात ऑटो थांबवली; डिस्चार्ज मिळालेल्या पित्याला तो उचलून घरी घेऊन गेला
2 Coronavirus: “आम्हालाही मदत करा”, पाकिस्तानने भारतासमोर पसरले हात
3 Covid-19 वर लस एकमेव मार्ग, तरच जग पूर्वपदावर येईल – संयुक्त राष्ट्रप्रमुख
Just Now!
X