24 February 2021

News Flash

२०१७-१८ तील जीडीपीच्या दरात घटीचा अंदाज; मोदी सरकारसाठी मोठा झटका ?

सांख्यिकी मंत्रालयाची माहिती

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली : आर्थिक आघाड्यांवर अनेक आव्हानांचा समाना करीत असलेल्या मोदी सरकारला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, वित्तीय वर्ष २०१७-१८ तील एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढीचा (जीडीपी) दर घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरकारच्याच सांखिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (सीएसओ) हा अंदाज वर्तवला आहे. सरकार सध्या आगामी वर्ष २०१८-१९च्या अर्थसंकल्पाची तयारी करीत आहे. या पार्श्वभूमीवर हा अंदाज महत्वाचा मानला जात आहे.

मंत्रालयाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वित्तीय वर्ष २०१७-१८च्या जीडीपी वाढीचा दर ६.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ७.१ टक्क्यांपेक्षा हा दर खूपच कमी आहे. त्यामुळे सरकारसाठी हा झटकाच मानला जात आहे.

सध्या सरकारला आर्थिक आघाड्यांवर सातत्याने अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदी, जीएसटी यांच्या अंमलबजावणीमुळे घरगुती उत्पादनांत घट होत राहिली आहे. याचा परिणाम रोजगारांवरही झाला असून रोजगार निर्मितीही घटली आहे. अशातच ही बातमी सरकारसाठी खूपच चिंताजनक मानली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 8:01 pm

Web Title: growth in gdp during 2017 18 estimated at 6 5 percent as compared to growth rate of 7 1 percent in 2016 17 ministry of statistics programme implementation
Next Stories
1 तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत अडकले; सरकारकडे उरलेत मोजकेच पर्याय
2 या शहरातल्या हज हाऊसला भगवा रंग
3 पाकिस्तानकडून पुंछ भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडून जोरदार प्रत्युत्तर
Just Now!
X