25 November 2020

News Flash

‘या’ कंपन्या चालवणार देशात Private Trains?; रेल्वे लवकरच घेणार निर्णय

16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल...

(संग्रहित छायाचित्र)

भारत सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाला यापूर्वीच परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर अनेक कंपन्यांनी प्रवासी खासगी रेल्वे चालवण्यास उत्सुकता दाखवत आपले अर्ज सादर केले आहेत. रेल्वेच्या खासगीकरणामध्ये पहिल्या टप्प्यात 12 ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या खासगी ट्रेन कोण चालवणार यासंदर्भात रेल्वेने अर्ज मागवले होते. याला प्रतिसाद देताना एकूण 16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी करुन त्या कंपन्यांच्या नावांना अंतिम स्वरुप देण्यास सुरूवात झाली आहे.

दोन टप्प्यात निवड :-
भारतीय रेल्वेने गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, खासगी ट्रेन चालवण्यासाठी कंपन्यांची निवड दोन टप्प्यात बिडिंग प्रक्रियेअंतर्गत पारदर्शी प्रकारे केली जाणार आहे. पहिला टप्पा Request For Qualification (RFQ) आहे आणि दुसरा टप्पा Request For Proposal (RFP) हा आहे. रेल्वेकडे ट्रेन चालवण्यासाठी एकूण 16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 102 अर्ज पुढील टप्पा म्हणजे Request For Proposal (RFP) साठी योग्य ठरवण्यात आले आहेत. यामध्ये काही मोठ्या नावांचा समावेश आहे.

खासगी कंपन्यांचा शानदार प्रतिसाद :-
12 क्लस्टर्ससाठी RFQ ची यादी 1 जुलै 2020 रोजी जाहीर झाली आहे. खासगी ट्रेन चालवण्याच्या या प्रकल्पात 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. तर, RFP साठी 7 ऑक्टोबर 2020 रोजी अर्ज मागवण्यात आले होते. खासगी कंपन्यांकडून याला शानदार प्रतिसाद मिळालाय.

या कंपन्यांची नावं पुढे :-
1. IRCTC
2. GMR Highways Ltd.
3. Gateway Rail Freight Ltd.
4. IRB Infrastructures Developers
5. Welspun Enterprise Ltd.

याशिवाय ज्या कंपन्यांनी क्लस्टरसाठी अर्ज केला आहे त्यामध्ये Arvind Aviation, BHEL, Construcciones y Auxiliar de Ferrocarrriles, S.A, Malempati Power Private Ltd आणि Cube Highways and Infrastructure III Pvt Ltd यांचा समावेश आहे.

दिल्ली, मुंबई क्लस्टरला सर्वोत्तम प्रतिसाद :-
व्यस्त मार्ग आणि प्रवासी संख्येमुळे दिल्ली आणि मुंबई क्लस्टरसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. मुंबई आणि दिल्ली क्लस्टरसाठी 19, चंदीगड आणि चेन्नई क्लस्टर्ससाठी 5, जयपुर आणि सिकंदराबाद क्लस्टर्ससाठी 9 , हावडा, बंगळुरू आणि पाटणा क्लस्टरसाठी 8-8 अर्ज पात्र ठरले आहेत.

हे आहेत खासगी ट्रेनचे 12 क्लस्टर्स :-
Cluster 1      मुंबई 1
Cluster 2     मुंबई 2
Cluster 3     दिल्ली 1
Cluster 4     दिल्ली 2
Cluster 5     चंडीगड
Cluster 6    हावडा
Cluster 7    पाटणा
Cluster 8    प्रयागराज
Cluster 9   सिकंदराबाद
Cluster 10  जयपूर
Cluster 11  चेन्नई
Cluster 12  बंगळुरू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 9:57 am

Web Title: indian railways finds 102 applications eligible for operations in 12 clusters for private trains sas 89
Next Stories
1 Coronavirus : देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला ९० लाखांचा टप्पा
2 पाकिस्तान सुधारणार नाही; त्यांना मुर्ख, अशिक्षित दहशतवादी मिळतच राहणार : व्ही.के.सिंह
3 भीषण अपघात : उभ्या ट्रकला भरधाव जीप धडकली, सहा मुलांसह १४ जणांचा मृत्यू
Just Now!
X