काश्मीरमधील अवंतीपोरा या ठिकाणी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पकडण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी शोधमोहिमही सुरु आहे असंही लष्कराने स्पष्ट केलं. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात गोळीबार सुरु होता. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाने आणि लष्कराने तोडीस तोड उत्तर दिलं. या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

काश्मीरमधील अवंतीपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळालीच होती. त्यानुसार शोध मोहिम राबवण्यात आली आणि कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. तरीही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरुच ठेवला. ज्यानंतर सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एका भल्यामोठ्या घरात हे तीन दहशतवादी लपून बसले होते. सुरक्षा दलांनी त्यांचा खात्मा केला.