ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. ग्राहकांनी वाइन शॉप किंवा पानाच्या गादीवर सहा फूट अंतर राखून रांग लावावी असं सांगण्यात आलं आहे. पाचपेक्षा जास्त माणसं एकावेळी शॉपमध्ये असू नये असंही सांगण्यात आलं आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप आणि पानाची गादी सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातले निर्देश दिले आहेत. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

काय आहेत अटी शर्थी?

वाइन शॉप्स, पानाची दुकानं फक्त ग्रीन झोनमध्येच उघडली जाणार

खरेदी करताना ग्राहकांनी सहा फुटांचं अंतर राखणं आवश्यक

एकावेळी शॉपमध्ये पाचपेक्षा जास्त लोक नकोत

महाराष्ट्रातले किती जिल्हे ग्रीन झोनमध्ये?

उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

 हे ही वाचा : Lockdown: कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये? ही घ्या संपूर्ण यादी

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समीक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता. त्यावेळी सर्व राज्यांकडून त्यांनी माहिती घेतली होती. तसंच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी विनंतीही केली होती. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत ३ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती. आता दोन पुन्हा एकदा दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे.