News Flash

नोकरी मिळवण्यासाठी त्याने वडिलांचा जीव घेतला, तेलंगणामधली धक्कादायक घटना

दोन भावांना पोलिसांनी केली अटक

नोकरी मिळवण्यासाठी त्याने वडिलांचा जीव घेतला, तेलंगणामधली धक्कादायक घटना
प्रतिकात्मक छायाचित्र

कंपनीत वडिलांच्या जागेवर काम करण्यासाठी तेलंगणात मुलाने आपल्याच वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या कटात त्याचा छोटा भाऊ आणि आईनेही साथ दिल्याचं उघड झालंय. पेड्डपल्ली जिल्ह्यातील कोथुर गावात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही भावांना अटक केली असून त्यांची आई फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन मोबाईल आणि हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला टॉवेलही ताब्यात घेतला आहे.

सदर प्रकरणात मृत व्यक्ती ही एका कंपनीत पंप ऑपरेटर म्हणून काम करत होती. वडिलांची हत्या करुन त्यांच्या जागी मुलाला नोकरी मागायची असा दोन भाऊ आणि आईने कट रचला. त्यानुसार मुलाने आपल्या वडिलांची रात्री झोपेत असताना टॉवेलने गळा आवळून हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी या परिवाराने शेजारील व्यक्तींना वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचा बनाव करत अंत्यसंस्काराची तयारी केली. शेजारच्यांना संशय आल्यामुळे त्यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं नेमकं कारण समजल्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली आहे. मोठ्या भावाने आपल्याला नोकरी मिळेल असं कारण सांगितल्यानंतर लहान भाऊ आणि आई त्याला मदत करायला तयार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही भावांवर हत्या आणि तपासात पोलिसांना खोटी माहिती दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती तेलंगणातील Singareni Collieries या कंपनीत कामाला होती. तेलंगणा राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त भागीदारीतून तयार झालेल्या या कंपनीत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना नोकरी मिळण्याचा नियम आहे. याचसाठी हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2020 4:41 pm

Web Title: man kills father to secure psu job on compassionate grounds in telangana psd 91
Next Stories
1 दाऊदचा मृत्यू झाला की तो जिवंत आहे; केंद्र सरकारने एकदाचं ठरवून सांगावं : सचिन सावंत
2 कहर… नेट बँकिंगची सुविधा दिली नाही म्हणून बँकेतला CPU चोरला
3 बिहारमध्ये भाजपाची नरमाईची भूमिका : नितीश कुमार असतील बिहार निवडणुकीचा चेहरा!
Just Now!
X