भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी ऋषीकेश येथे गंगा पूजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी चीनसह इतर शस्त्रू राष्ट्रांना कडक इशारा दिला होता. मात्र, आता डोवाल यांनी ते विधान चीनबाबत केले नव्हते असे स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे. डोवाल यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे विधान माध्यमांनी तोडून-मोडून दाखवले. त्यांनी हे विधान आध्यात्मासंदर्भात केलं होतं. ते चीन किंवा चीनसोबतच्या सुरु असलेल्या पूर्व लडाखमधील वादाबाबतही नव्हते.”

गरज पडल्यास सीमोल्लंघनाचीही तयारी; दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित डोवाल यांचा इशारा

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डोवाल ऋषीकेश येते बोलाताना म्हणाले होते की, भारताने यापूर्वी कधीही कोणावर हल्ला केलेला नाही. मात्र, हा नवा भारत आहे, त्यामुळे जर आता देशावर संकट आलं असेल तर आम्ही सीमापार जाऊन युद्धही करु शकतो.