News Flash

‘तोयबा, जमातचे दहशतवादी देशभक्तच’

दहशतवाद्यांच्या राजकीय पक्षांशी हातमिळवणीस तयार

| December 18, 2017 01:27 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुशर्रफ यांची मुक्ताफळे; दहशतवाद्यांच्या राजकीय पक्षांशी हातमिळवणीस तयार

लष्कर ए तोयबा व जमात उद दवा या दोन्ही गटांचे दहशतवादी हे देशभक्त असून पाकिस्तानच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या राजकीय पक्षांशी आघाडी करण्यास तयारी असल्याचे पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी सांगितले.

मुशर्रफ हे सध्या दुबईत विजनवासात असून त्यांनी गेल्या महिन्यात असे सांगितले की, लष्कर ए तोयबा व त्याचा संस्थापक असलेल्या हाफिज सईदचे आपण समर्थक आहोत. हाफिज सईद हा जमात उद दवाचा प्रमुख असून तो मुंबई हल्ल्यात प्रमुख सूत्रधार होता.

एआरवाय वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, लष्कर ए तोयबा व जमात उद दवाचे दहशतवादी हे देशभक्त असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. दोन्ही गटांना चांगल्या लोकांचा पाठिंबा असून त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्यास त्याला कुणाचाही आक्षेप असता कामा नये. मुंबईत २००८ मधील हल्ल्यात १६६ जण ठार झाल्यानंतर लष्कर ए तोयबा या संघटनेवर बंदी घालण्यात आली. नंतर अमेरिकेने जून २०१४ मध्ये जमात उद दवा या संघटनेलाही परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले. जमात उद दवाचा प्रमुख सईद हा मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार असून त्याने राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी मिली मुस्लिम लीग हा पक्ष स्थापन केला आहे. हा पक्ष २०१८ मध्ये निवडणूक लढवणार आहे.

मुशर्रफ यांनी सांगितले की, आतापर्यंत तरी या दोन गटांनी माझ्याकडे पाठिंबा मागितलेला नाही पण तसा पाठिंबा देण्यास काही हरकत नाही. मुशर्रफ यांनी गेल्या महिन्यात महाआघाडी करण्याचा प्रयत्न केला त्यात २४ हून अधिक पक्षांची बैठक झाली पण नंतर अनेक पक्षांनी त्यांच्या पाकिस्तान अवामी इत्तेहाद या आघाडीपासून काडीमोड घेतला.  मुशर्रफ यांनी कारगिलचा संघर्ष घडवून आणला होता व त्यानंतर नवाझ शरीफ यांचे सरकार १९९९ मध्ये पाडले होते. नंतर मुशर्रफ हे नऊ वर्षे अध्यक्ष होते. दुबईतील पाच वर्षांच्या विजनवासातून आल्यावर त्यांनी २०१३ च्या निवडणुका लढवल्या पण त्यात त्यांना अपयश आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:27 am

Web Title: pervez musharraf hails let jud terrorists as patriotic
Next Stories
1 सुखोई विमानांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू
2 तामिळनाडूच्या राज्यपालांकडून अधिकारांच्या मर्यादांचे उल्लंघन
3 एक्स्प्रेस उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे बुधवारी वितरण
Just Now!
X