Petrol-Diesel Price Today on 17 July: सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोलचे नवीन दर जारी केले आहेत. गुरुवारी इंधनाचे दर वाढवल्यानंतर शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा इंधनाचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ३० पैसे प्रतिलिटरने महागले तर मुंबईमधील पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ झालीय. दिल्लीमध्ये आजपासून पेट्रोल १०१.८४ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. डिझेलच्या दरामध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाही. डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहे. मुंबईमध्ये एका लिटर पेट्रोलसाठी आता १०७.८३ रुपये मोजावे लागत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये मे महिन्यापासून आतापर्यंत ४१ वेळा इंधनदरवाढ करण्यात आली आहे. या ४१ दिवसांमध्ये पेट्रोल १०.७९ रुपयांनी तर डिझेल ८.९९ रुपयांनी महागले आहे. जुलै महिन्यामध्येच नऊ वेळा इंधनरदवाढ झाली आहे. मे महिन्यात १६ वेळा पेट्रोलचे दर वाढलेत. गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी वाढ करण्यात आली होती. गेल्या ४ मेपासून पेट्रोलच्या दरात ४१ वेळा तर डिझेलच्या दरात ३७ वेळा वाढ करण्यात आली. देशामध्ये गुरुवारच्या आधी तीन दिवस इंधनाचे दर स्थिर होते. मात्र गुरुवारी त्यात वाढ करण्यात आली. शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा दरवाढ करण्यात आलीय. मागील दोन महिन्यांमध्ये देशातील इंधनाचे दर प्रती लीटरमागे दहा रुपयांनी वाढले आहेत.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

नक्की पाहा >> “या फोटोला कॅप्शन सुचवा…”; पेट्रोल पंपावरच मोदींसमोर लोटांगण घातल्याचा फोटो झाला व्हायरल

चार मोठ्या शहरांमधील पेट्रोल, डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price on 17 July 2021)

>> दिल्ली – पेट्रोल १०१.८४ रुपये आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रतिलिटर
>> मुंबई – पेट्रोल १०७.८३ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये प्रतिलिटर
>> चेन्नई – पेट्रोल १०२.४९ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलिटर
>> कोलकाता – पेट्रोल १०२.०८ रुपये आणि डिझेल ९३.०२ रुपये प्रतिलिटर

नक्की पाहा >>  Petrol Price : ‘या’ देशात १.४५ रुपये प्रतिलिटर दरात मिळतं पेट्रोल

इतर शहरांमधील भाव

>> बेंगलुरु – पेट्रोल १०५.२५ रुपये आणि डिझेल ९५.२६ रुपये प्रतिलिटर
>> लखनऊ – पेट्रोल ९८.६९ रुपये आणि डिझेल ९०.२६ रुपये प्रतिलिटर
>> पाटणा – पेट्रोल १०४.५७ रुपये आणि डिझेल ९५.८१ रुपये प्रतिलिटर
>> भोपाळ – पेट्रोल ११०.२५ रुपये आणि डिझेल ९८.६७ रुपये प्रतिलिटर
>> जयपूर – पेट्रोल १०८.७१ रुपये आणि डिझेल ९९.०२ रुपये प्रतिलिटर
>> गुरुग्राम – पेट्रोल ९९.४६ रुपये आणि डिझेल ९०.४७ रुपये प्रतिलिटर
>> पुणे – पेट्रोल १०७.१० रुपये आणि डिझेल ९५.५४ रुपये प्रतिलिटर
>> नागपूर – पेट्रोल १०७.२० रुपये आणि डिझेल ९५.७६ रुपये प्रतिलिटर
>> नाशिक – पेट्रोल १०७.५० रुपये आणि डिझेल ९६.२३ रुपये प्रतिलिटर

देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.