02 March 2021

News Flash

पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, २०१८ मधील सर्वात स्वस्त पेट्रोल आज

१८ ऑक्टोबरपासून पेट्रोल दरात १३.७९, तर डिझेलच्या दरात १२.०६ रुपयांची घसरण

गेल्या काही दिवसांपासून देशात इंधन दरात कपात होताना दिसत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा २०१८ मध्ये भडका उडाला होता. गेल्या काही दिवसांत इंधन दरात सातत्याने घट होऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर वर्षभरातील नीचांकी पातळीवर आले आहेत. २०१८ मधील सर्वात स्वत पेट्रोल आज मिळणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोल आज ७४.४७ रूपये प्रतिलिटर आहे. मुंबईत प्रथमताच पेट्रोलदराने प्रतिलिटर ७५ रुपयांच्या खालील पातळी गाठली आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोल प्रतिलिटर ६८. ८४ रूपये आहे..

पेट्रोल व डिझेलच्या दरात दीड महिन्यांपासून सतत कपात होत असून रविवारी पेट्रोलदर प्रतिलिटर २२ पैशांनी तर, डिझेलदर प्रतिलिटर २४ पैशांनी कमी करण्यात आले होतं. आज यामध्ये आणखी कपात झाली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे ७४.४७ व ६५.७६ रूपये नोंदविण्यात आले. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर अनुक्रमे ६८.८४ आणि ६२.८६ रूपये नोंदवण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या इंधनाच्या किंमती घसरत असल्याचा भारतासारख्या देशांना फायदा होत असून पेट्रोल व डिझेलच्या देशांतर्गत किंमतींनी चालू वर्षातील नवा नीचांक नोंदवला आहे.  १८ ऑक्टोबरपासून पेट्रोल दरात १३.७९, तर डिझेलच्या दरात १२.०६ रुपयांची घसरण झाली आहे. इंधन दरवाढ शंभरी गाठणार, अशी शक्यता वर्तवली जात असताना केंद्र सरकारनं पावलं उचलत पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दीड रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच इंधन कंपन्यांना प्रति लीटरमागे एक रुपयाचा तोटा सहन करण्यास सांगितलं होतं. सरकारच्या या निर्णयानंतर इंधन दरात घसरण होऊ लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 8:57 am

Web Title: petrol price down to its lowest level in 2018
Next Stories
1 पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय लष्कराने मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
2 ‘तिहेरी तलाक’ विधेयक आज राज्यसभेत, भाजपा-काँग्रेसकडून खासदारांना ‘व्हिप’
3 बांगलादेशमध्ये हिंसाचारात १७ ठार
Just Now!
X