News Flash

रामगोपाल यादव यांचं वक्तव्य घाणेरड्या राजकारणाचं उदाहरण – योगी आदित्यनाथ

पुलवामा हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल असा खळबळजनक आरोप रामगोपाल यादव यांनी केला आहे

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर उत्तर प्रदेशातील समाजवादी नेते रामगोपाल यादव यांनी धक्कादायक वक्तव्य केलं असून हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल, असा खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामगोपाल यादव यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

‘रामगोपाल यादव यांचं वक्तव्य घाणेरड्या राजकारणाचं उदाहरण आहे. त्यांनी सीआरपीएफ जवानांच्या हौतात्म्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं तसंच देशाच्या जवानांचं मानसिक खच्चीकरण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी देशाची माफी मागितली पाहिजे’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

‘मतांसाठी पुलवामात जवानांवर हल्ला घडवून आणण्यात आला, त्यामुळे अर्धसैनिक दले सरकारवर नाराज आहेत. जवानांना घेऊन इतका मोठा ताफा महामार्गावरुन जात असताना जम्मू-श्रीनगर दरम्यान तपासणी झाली नाही. तसेच या जवानांना साध्या बस मधून रवाना केले जात होते. त्यामुळे हा सगळा कट होता’, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, या कटात कोण सामील होतं हे मी आत्ता सांगू इच्छित नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर याची जेव्हा चौकशी होईल तेव्हा बड्या नेत्यांची पोलखोल होईल, असे यादव यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 6:07 pm

Web Title: ramgopal yadav should apologize demands yogi adityanath
Next Stories
1 विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आचारसंहितेचे उल्लंघन नाही, राहुल गांधींना क्लीन चिट
2 महिला आयकर आयुक्तांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये प्रवेश
3 होळीच्या सेलिब्रेशनदरम्यान भाजपा आमदारावर गोळीबार; रुग्णालयात दाखल
Just Now!
X