22 July 2019

News Flash

RBI कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ‘जैसे थे’

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो रेट ६.५ टक्के , रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (संग्रहित छायाचित्र)

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने ६.५ टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे. तसेच रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के आणि बँक रेट ६.७५ टक्के कायम ठेवला आहे. २०१९-२० मध्ये जीडीपी ७.४ टक्के राहिल असा अंदाज आहे. २०१८-१९ च्या दुसऱ्या सत्रात महागाई दर २.७ ते ३.२ टक्के राहिल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला.

नुकतेच जीडीपीची आकडे समोर आले. त्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपीमध्ये ७.१ टक्क्यापर्यंत घसरण झाली. त्याआधीच्या तिमाहीत जीडीपी ८.२ टक्के होता. यावर्षात आरबीआयने आतापर्यंत दोनदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर सेन्सेक्समध्ये काही अंकांची घसरण झाली. अर्थतज्ञांनी आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

रेपो व रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतं त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

First Published on December 5, 2018 2:50 pm

Web Title: rbi not change repo reverse repo rate
टॅग Rbi