07 March 2021

News Flash

उद्योगक्षेत्राला दिलासा नाहीच, RBI कडून व्याजदर ‘जैसे थे’

आरबीआयने पतधोरण आढावा जाहीर करताना व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. उद्योगक्षेत्राकडून व्याजदर कपातीची अपेक्षा केली जात होती.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केले. आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो रेट ६ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के कायम ठेवला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचे चलनवाढीच्या दृष्टीने होणारे परिणाम पाहता व्याजाचे दर कमी केली जाण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषकांचे मत होते. उद्योगक्षेत्राकडून व्याजदर कपातीची अपेक्षा केली जात होती. रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वात व्याज दर निश्चित करणाऱ्या सहा सदस्य असलेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रेपो रेट म्हणजे काय
– रिझर्व्ह बँक अन्य व्यावसायिक बँकांना आर्थिक व्यवहारांसाठी अल्पमुदतीचे कर्ज देते. ज्या व्याज दराने हे कर्ज दिले जाते त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट कमी झाल्यास बँकांना कमी दरात कर्ज मिळते. बँकांनी तोच फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अपेक्षित असते. त्यामुळे ग्राहकांना कर्जावर भरावे लागणारे व्याजाचे दर कमी होतात.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय
– रिव्हर्स रेपो रेट म्हणजे आरबीआय अन्य बँकांकडून ज्या दराने पैसे घेतो तो दर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 3:49 pm

Web Title: rbi unchanged repo rate
टॅग : Interest Rate,Rbi
Next Stories
1 तीन वर्षांत सरकारी बँकांच्या २.४ लाख कोटींच्या कर्ज रकमेवर पाणी!
2 आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन प्रकरणी चौकशीबाबत कंपनी व्यवहार खातेच अनभिज्ञ
3 अमेरिकेच्या ‘अरे’ला चीनचे ‘कारे’, मधल्या मध्ये सेन्सेक्सची 350 अंकांची घसरण
Just Now!
X