जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम पूर्ण झालं आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

(सर्व फोटो सौजन्य – संतोष हिर्लेकर)

सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे

 

हा पुतळा उभारण्यासाठी 3500 कामगार आणि 250 इंजिनिअर दिवस-रात्र मेहनत घेत होते

 

सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रस्तावित १८२ मीटर उंचीचा पुतळा लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आला आहे

 

स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापेक्षा दीडपट तर न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०१३ मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता

 

पुढील चार वर्षांत लॉर्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीला काम करण्यास देण्यात आले. या पुतळ्यासाठी जवळपास तीन हजार कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती

 

पर्यटकांना सरदार सरोवर धरण आणि आजुबाजूचा परिसर पाहण्यासाठी 500 फूट उंचीवर गॅलरी उभारण्यात येणार आहे