News Flash

राम मंदिर: आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगी परत घ्यावी; साक्षी महाराजांचे आवाहन

खासदार साक्षी महाराज यांनी राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आवाहन केले आहे.

भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांच्या बँक खात्यातून ठगांनी रक्कम काढली (photo indian express)

राम मंदिर संस्थानने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जागेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राजकारण पहायला मिळत आहे. खासदार साक्षी महाराज यांनी राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आवाहन केले आहे. आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगीची रक्कम परत घेऊन जावी, असे साक्षी महाराज म्हणाले. ते आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी आम आदमी पक्षाचे संजय सिंह आणि सपाचे माजी आमदार पवन पांडे यांच्यावर टीका केली.

साक्षी महाराज म्हणाले, “ज्या पक्षाच्या प्रमुखांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता. तेथे आज रामचे भव्य मंदिर बांधले जात आहे. त्यामुळे अशा लोकांना हे पचत नाही. राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी आपले संपूर्ण जीवन भगवान रामसाठी समर्पित केले आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. म्हणून, अशा व्यक्तीवर आरोप करणे पूर्णपणे निराधार आहे. जर आपण देणग्यांबद्दल बोलत असला तर आपण हिशोब घेऊ शकता किंवा पावती दाखवून देणगी परत घेऊ शकता” असे अवाहन साक्षी महाराज यांनी खासदार संजय सिंह आणि अखिलेश यादव यांना केले आहे.

हेही वाचा-  Ayodhya Land Deal: १८ कोटींमध्ये जमीन घेतली? ; ट्रस्टने भाजपा व आरएसएसला पाठविला अहवाल 

साक्षी महाराज म्हणाले की, राम मंदिराचा तीव्र विरोध करणारे हे लोकं आहेत. ते म्हणायचे की राम मंदिराच्या नावाने अयोध्येत वीट ठेवता येणार नाही. आज त्याच अयोध्येत भगवान राम यांचे भव्य आणि जगातील सर्वोत्कृष्ट मंदिर बांधले जाणार आहे.

आरोप काय?

‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या दाव्यानुसार, राम जन्मभूमीलगत असणाऱ्या या जमिनीची १८ मार्च २०२१ रोजी खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आणि त्या वेळी जमिनीची किंमत २ कोटी दाखवण्यात आली. सपचे नेते पवन पांडे यांनी दोन मूळ मालकांची, तसेच दोन खरेदीदारांची नावे पत्रकार परिषदेत उघड केली. या खरेदीदारांनी ही जमीन ५.७ कोटी रुपयांना खरेदी केली. हा जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर दोन्ही खरेदीदारांनी पुढील १० मिनिटांमध्ये ही जमीन राम जन्मभूमी न्यासाला १८.५ कोटींना विकल्याचा दावाही या नेत्यांनी केला,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 1:44 pm

Web Title: show your recepit and take back your donatioan says mp sakshi maharaj srk 94
Next Stories
1 RSS ची नोंदणी का नाही झाली? संघ टॅक्स का भरत नाही? हे देशाचे मालक आहेत का? काँग्रेस नेत्याचे सवाल!
2 पेट्रोल-डिझेलची शंभरी, खाद्य तेल २०० पार…अच्छे दिन आ गये!; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांची टीका
3 सीईओ सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Just Now!
X