11 August 2020

News Flash

‘मोदींबाबत सदिच्छा कोठे गेली?’

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची घेतलेली सदिच्छा भेट हा संस्काराचा भाग होता,

| September 25, 2013 12:58 pm

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची घेतलेली सदिच्छा भेट हा संस्काराचा भाग होता, अशा शब्दांत सत्तारूढ जद(यू)ने नितीशकुमार यांचे समर्थन केले. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात नितीशकुमार यांच्यात याच संस्कारांचा अभाव का होता, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी उपस्थित केला आहे. नितीशकुमार पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी हस्तांदोलन करू शकतात, परंतु नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यास नकार देतात, असे सुशील मोदी यांनी ट्विट केले आहे.भारतीय राजकीय क्षेत्रासाठी अशा प्रकारची अस्पृश्यता योग्य आहे का, असे सवालही सुशील मोदी यांनी उपस्थित केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2013 12:58 pm

Web Title: sushil modi questions nitish kumars lacking courtesy towards namo
Next Stories
1 कराचीत जायला ‘व्हिसा’ लागत नव्हता – यासिन भटकळ
2 काँग्रेसच्या तुलनेत भाजपशासित राज्यांचा सर्वांगिण विकास! – नरेंद्र मोदी
3 राजकारण्यांवरील विश्वासार्हतेबाबत भारतीय जगात ११५ व्या क्रमांकावर
Just Now!
X