News Flash

‘तनिष्क’च्या शोरूमवर कोणताही हल्ला झालेला नाही, पोलिसांनी केलं स्पष्ट

सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली होती...

(संग्रहित छायाचित्र)

दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाल्याचे वृत्त गुजरात पोलिसांनी फेटाळले आहे. काही प्रसारमाध्यांनी ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन झालेल्या वादातून गांधीधाममधील हल्ला झाल्याचे वृत्त दिलं होतं. मात्र अशाप्रकारचा कोणताही हल्ला झाला नसल्याचे कच्छचे (पूर्व) पोलीस अधिक्षक मयुर पाटील यांनी यासंदर्भात एएनआयकशी संवाद साधताना संबंधित वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे. दुकान मालकानेही हल्ला झाल्याचे वृत्त फेटाळलं असून धमकी देण्यात आल्याचं सांगितलं आहे.  सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली होती.

काय होती ही जाहीरात ?

हिंदू सुनेचे डोहाळजेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचे दाखविणारी ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप अत्यंत तीव्रतेने झाल्याने ‘तनिष्क’ने आपली जाहिरात मागे घेतली.

‘एकत्वम’ या नावाने गेल्या आठवडय़ामध्ये यू-टय़ुब या माध्यमाद्वारे ४५ सेकंदाची ही जाहिरात प्रसारित झाली. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखे प्रेम मिळणाऱ्या हिंदूू सुनेच्या डोहाळजेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहिरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचे मांडण्यात आले होते.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर, अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि कित्येक मान्यवरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत असल्याबद्दल या जाहिरातीचे प्रचंड कौतुक केले. मात्र भाजप नेत्या कोटापल्ली गीता आणि यांनी त्यावर ट्विटरद्वारे टीका केली. समाज माध्यमांवर ही जाहिरात लव्ह जिहादचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या कटू वादानंतर कंपनीने ही जाहिरात समाज माध्यमांवरून मागे घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:25 pm

Web Title: tanishq store attacked in gujarat amid row over ad dmp 82
Next Stories
1 पँगाँग तलावात भारताने पाण्याखालून चाल करु नये, म्हणून चीन….
2 झटका, अमेरिकेत २४ तासात जॉन्सनच्या लशीपाठोपाठ आणखी एका औषधाची थांबवली चाचणी
3 ट्रम्प यांना करोना झाल्याने निराश झालेल्या भारतीय चाहत्याचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन
Just Now!
X