दिल्लीमध्ये आज (गुरुवार) संसदेत हिटलरला पाहून सर्व खासदार अवाक झाले होते. पण हे जर्मनीचे नव्हे आंध्र प्रदेशचे हिटलर होते. झाले असे की, आंध्र प्रदेश राज्याच्या विशेष दर्जाच्या मागणीसाठी तेलगू देसम पार्टीचे खासदार एन. शिवप्रसाद वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. आज एन. शिवप्रसाद अॅडॉफ हिटलरच्या अवतरात संसदेत आले होते.
टीडीपी खासदार एन. शिवप्रसाद या आधी पारंपारिक साडी नेसून महिलेच्या वेशात आले होते. विद्यार्थी, नाराद मुनी तसेच अनेक वेगवेळी वेशभूषा परिधान करून संसदेत हजर राहिले आहेत. अनेक वेगवेगळ्या वेशभूषात परिधान करून सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात.

एन. शिवप्रसाद राजकारणात येण्यापूर्वी स्थानिक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करत होते. आंध्र प्रदेश मधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत शिवप्रसाद यांचे नाव घेतले जाते. याआधी काळ्या पैशांच्या विरोधात पांढरा-काळा अर्धा अर्धा शर्ट घालून संसदेत हजेरी लावत माध्यमांचे लक्ष वेधले होते.

तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी मोदी सरकारकडे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. मार्च २०१८ मध्ये या मागणीसाठी भाजपा सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. २०१४ नंतर सत्तेत आल्यानंतर सत्तेततून बाहेर पडणारा टीडीपी पहिला पक्ष ठरला.